Lockdown : मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममुळं लोकांचे वाचले तब्बल 300 कोटी, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान खरेदी आणि लॉजिस्टिक्सशी संबंधात अडचणी असूनही पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्रानं एप्रिल महिन्यात ५२ कोटी रुपयांची विक्री केली आहे. याबाबत केंद्रीय रसायन व खत मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या केंद्रांनी एप्रिलमध्ये ५२ कोटी आणि मार्चमध्ये ४२ कोटींची विक्री केली. तसंच या निवेदनात म्हटले आहे की यामुळे जनतेची सुमारे ३०० कोटी रुपयांची बचत झाली आहे.

जनऔषधी केंद्रात ५० ते ९० टक्के स्वस्त मिळतात औषधे

पंतप्रधान भारती जन औषधी योजनतेतून देशातील ७२६ जिल्ह्यातील ६ हजार ३९९ हुन अधिक केंद्रांवरती सरासरी बाजार भावापेक्षा ५० ते ९० टक्के स्वस्त औषधे लोकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे असं या निवेदनात म्हटलं आहे.

जनऔषधी केंद्रे कसे सुरु करणार?

जनऔषधी केंद्रे उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी असून हे काम ऑनलाइन पद्धतीने देखील केले जाऊ शकतं. तसंच जनऔषधी केंद्र उघडण्यास फारसा खर्च येत नाही. जो खर्च येईल तो सरकार हळू हळू तुम्हाला परत करते. त्याचसोबत कमिशनही दिले जाते.

तीन गटांत सुरु करता येतात जनऔषधी केंद्र.

पहिल्या गटात कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मसिस्ट, डॉक्टर, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिका जनऔषधी केंद्र उघडू शकतात. दुसऱ्या प्रकारामध्ये ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, खाजगी रुग्णालये, सोसायट्या व बचतगट जनऔषधी केंद्रे उघडू शकतात. तिसऱ्या प्रकारात राज्य सरकारच्या वतीने नामित एजन्सी जनऔषधी केंद्रे उघडू शकतात.

सरकारकडून अशी मिळते मदत.

जनऔषधी केंद्र सुरु करण्यासाठी २.५ लाखांपर्यंत मदत सरकार करते. औषधांची विक्री केल्यांनतर यातून २० टक्के कमिशन मिळते. तसंच प्रत्येक महिन्याच्या विक्रीवरती १५ टक्के इन्सेंटिव्ह वेगळा दिला जातो. इन्सेंटिव्ह कमाल मर्यादा महिन्यास १० हजार रुपये पर्यंत निश्चित केलेली आहे.