तुम्ही ‘या’ भारतीय महिला क्रिकेटपटूचा धमाकेदार डान्स पाहिलात का ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असून सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. यादरम्यान, काही क्रिकेटपटू टीक-टॉकवर व्हिडीओ बनवण्यात व्यस्त आहेत. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आघाडीवर आहे. त्याच्या पाठोपाठ आता भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती ही देखील टीक-टॉकच्या प्रेमात असल्याचे दिसून आले आहे.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताची क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे डान्स हिट झाला होता. आता भारतीय संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्तीचा डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. वेदा कृष्णमूर्तीने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनही दिले आहे. कोरोनामुळे क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून आयपीएल आयोजन लांबणीवर टाकण्यात आले आहे. सर्व क्रिकेटपटूनी चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत.