‘कोरोना’ पॉझिटीव्हीटी रेटमध्ये महाराष्ट्र ‘टॉप’वर, जाणून घ्या सॅम्पल टेस्टमध्ये कोणतं राज्य पुढं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग सतत वाढतच चालला आहे. देशात सोमवारी सुद्धा कोविड-19 ची 14,821 प्रकरणे समोर आली. ज्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या वाढून 4,25,282 झाली आहे. तर एका दिवसात 445 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकुण मृतांचा आकडा 13,699 झाला आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या सूत्रांनुसार, महाराष्ट्रात पॉझिटीव्हीटी रेट सर्वात जास्त आहे. त्यांनतर दिल्ली आणि तामिळनाडुचा नंबर येतो.

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा पॉझिटीव्हीटी रेट 31.76% आहे. तर दिल्लीत तो 22.29 आणि तामिळनाडुत 16.29 टक्के आहे. देशात 21 जूनपर्यंत एकुण 69,50,493 सॅम्पलची तपासणी करण्यात आली. तर केवळ 21 जूनलाच 1,43,267 सॅम्पलची तपासणी केली गेली. सॅम्पल टेस्टींगच्या बाबतीत तामिळनाडु टॉपवर आहे. तर दिल्ली 8व्या नंबरवर आहे. तामिळनाडुमध्ये 21 जूनपर्यंत 7,71,263 सॅम्पल टेस्ट करण्यात आले. तर महाराष्ट्रात 7,70,711 सॅम्पल टेस्ट केले गेले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी म्हटले की, दाट लोकसंख्या असूनही भारतात प्रति लाख व्यक्तींवर कोविड-19 ची प्रकरणे जगात सर्वात कमी आहेत आणि बरे होण्याचा दर आता सुमारे 56 टक्क्यांवर पोहचला आहे. मंत्रालयाने डब्ल्यूएचओच्या 21 जूनच्या 153 व्या स्थिती रिपोर्टचा संदर्भ देत म्हटले की, भारतात प्रति एक लाख लोकसंख्येमागे कोरोना व्हायरसची 30.04 प्रकरणे आहेत, तर जागतिक सरासरी तीन पटीपेक्षा सुद्धा जास्त 114.67 टक्के आहे.