कोरोनाचे औषध ‘AAYUDA Advance’ आले बाजारात; 4 दिवसांच्या आत व्हायरसचा पराभव करण्याचा दावा

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या कहरमध्ये एक चांगली बातमी आहे. अहमदाबादच्या दोन शासकीय रुग्णालयात झालेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाविरुद्ध ”AAYUDA Advance” हे औषध प्रभावी असल्याचे दिसून आहे आहे. चाचणी दरम्यान असे आढळले की आयुष्य ऍडव्हान्स घेतलेल्या रुग्णांनी चार दिवसांत व्हायरसचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी केला आहे.

कोणताही दुष्परिणाम नाही
”AAYUDA Advance” चे कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. ”AAYUDA Advance” ने उपचार केलेले सर्व कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण कोविड-१९ निगेटिव्ह आले आणि ताप, खोकला, धाप लागणे यांसारख्या लक्षणांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. ‘कंटेम्परेरी क्लिनिकल ट्रायल कम्युनिकेशन’ या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ”AAYUDA Advance” कोरोनाच्या उपचारांमध्ये ऍडव्हान्स स्टॅंडर्ड ऑफ केयरवर लक्ष केंद्रित करते. हे संशोधन सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन, नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, अमेरिकाच्या वेबसाईटवर प्रकाशित झाले आहे.

अशाप्रकारे केली चाचणी
या औषधाची पहिली चाचणी ऑक्टोबर २०२० मध्ये श्रीमती NHL नगर मेडिकल कॉलेज आणि SVPIMSR, ऍलिसब्रीज, अहमदाबादमध्ये केली गेली. दुसरा ट्रायल जानेवारी २०२० मध्ये GMERS मेडिकल कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, सोला, अहमदाबाद येथे झाला. पहिल्या संशोधनादरम्यान, माईल्ड Symptoms वाल्या कोविड-१९ रुग्णांवर याचा प्रभाव पाहिला गेला. पहिल्या क्लिनिकल रिसर्चच्या यशस्वी निकालानंतर मोठ्या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर किंचित लक्षणे जास्त असलेल्या रुग्णांवर आणि नंतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर याची चाचणी करण्यात आली. या रुग्णांना दिवसातून चार वेळा ”AAYUDA Advance” चा डोस देण्यात आला आणि ते फक्त चार दिवसांत बरे झाले.

दोन उत्पादने बाजारात
याव्यतिरिक्त, ट्रांसलेशन हेल्थ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट- भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी द्वारे रेमडेसिविर च्या तुलनेत ”AAYUDA Advance” ला ३ पट अधिक प्रभावी मानले गेले आहे. गुजरातमध्ये निर्माण झालेले ”AAYUDA Advance” हे एक लिक्विड आहे, ज्यामध्ये २१ प्रकारच्या वनस्पतींचा अंश आहे. आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये मानवी वापरासाठी हे घटक प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. हे ५०,००० हजाराहून अधिक लोक वापरात आहेत. इल कंपनीची दोन उत्पादने आहेत. कोरोनाच्या रुग्णांसाठी ”AAYUDA Advance” आणि परिवाराच्या अन्य सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी ”AAYUDA Maintain” ही उत्पादने आहेत.