Covid-19 Mild Symptoms | एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांकडून जाणून घ्या कशाप्रकारे रूग्ण घरीच करू शकतात ‘कोरोना’च्या हलक्या लक्षणांवर आपला उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Covid-19 Mild Symptoms | देशात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज बाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे जात आहे. झपाट्याने पसरणार्‍या ओमिक्रॉन आणि कोविड संसर्गाच्या रुग्णांच्या उपचाराबाबत चिंता सतावत आहे. जरी नवीन प्रकार वेगाने पसरत असला तरी तो अतिशय सौम्य असल्याने (Corona Mild Symptoms) घाबरण्याची गरज नाही. पण काळजी घेणे खूप गरजेचे आहे, असे डॉक्टर (Dr Naveen Nishchal) सांगत आहेत. (Covid-19 Mild Symptoms)

 

कोविडबाबत काय म्हणतात एम्सचे डॉक्टर?
AIIMS च्या वैद्यकीय विभागात प्रा. डॉ. नीरज निश्चल म्हणाले की, कोरोनावर कोणतेही जादूचे औषध नाही. तसेच, या संसर्गावर अद्याप कोणताही विशिष्ट उपचार सापडलेला नाही.

 

अशावेळी सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच, रुग्णांची बारकाईने देखरेख केली पाहिजे. तसेच, comorbidity असलेल्या असे वृद्ध ज्यांचे अद्याप लसीकरण झालेले नाही, त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (Covid-19 Mild Symptoms)

 

प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्या, औषधांवर अवलंबून राहू नका
डॉ. नीरज निश्चल म्हणाले की, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करता येतात. यासाठी डॉक्टरांना दाखवणे किंवा हेवी औषधे घेणे आवश्यक नाही. कोणताही आजार केवळ औषधानेच बरा होऊ शकतो या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे.

 

घरी राहूनही किरकोळ उपचार करून तो बरा होऊ शकतो. तिसर्‍या लाटेमध्ये, ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट आणि कोविडच्या बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे अतिशय सौम्य आहेत. लोकांनी त्यांच्या इम्युनिटीवर विश्वास ठेवणे चांगले आहे. ती वाढवण्यासाठी निरोगी जीवनशैली, लसीकरण आणि कोविड विरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा.

शरीराच्या हे अवयव औषधाने होऊ शकतात डॅमेज
डॉ. निश्चल म्हणाले की, नुकतेच कोविडसाठी मोलनुपीरावीरला मान्यता मिळाली आहे. पण ही चादूची कांडी नाही. मोलनुपिरावीर मानवाच्या वेगाने विभाजित होणार्‍या पेशींवर परिणाम करू शकते. पुरुषांमधील प्रजनन अवयवांच्या पेशीं, गर्भवती महिलांमधील गर्भ, तरुण प्रौढ आणि मुलांच्या हाडांचे नुकसान होऊ शकते. (Corona Mild Symptoms)

 

ही औषधे ओमिक्रॉन विरुद्ध प्रभावी नाहीत
एम्समधील डॉ. निश्चल यांच्या मते, या औषधाच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कारण यात फायद्यापेक्षा हानीच जास्त आहे. ते Over-the-Counter औषध बनू नये.

 

तसेच रुग्णांना दिले जाणारे दुसरे औषध म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज (casirivimab and imdevimab)
चे कॉकटेल (कॅसिरिव्हिमाब आणि इमडेविमाब). हे लक्षात ठेवले पाहिजे की ते ओमिक्रॉन विरूद्ध प्रभावी नाही.

 

मोलनुपिराविरबद्दल मोठी चिंता
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की,
मोलनुपिराविरबद्दल काही प्रमुख चिंता आहेत. COVID-19 साठी उपचार म्हणून राष्ट्रीय प्रोटोकॉलमध्ये त्याचा समावेश केलेला नाही.

 

आता फक्त 5-10 टक्के लोकांनाच हॉस्पिटलची गरज
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे
की यावेळी कोविडच्या सक्रिय प्रकरणांपैकी केवळ 5 ते 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे.
आता परिस्थिती स्थिर आहे, परंतु भविष्यात संसर्ग धोकादायक बनू शकतो.

 

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सुमारे 20-30 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू लागली होती.
लोकसंख्येचा मोठा भाग आता पूर्णपणे लसीकरण झालेला आहे.

 

 

Web Title :- Covid-19-Mild-Symptoms | aiims doctor dr naveen nishchal patients with mild symptoms can do their treatment at home coronavirus news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

 

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

 

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात