कोविड-19 : केरळात 5 हजारपेक्षा जास्त प्रकरणे, ‘या’ राज्यांनी वाढवली केंद्राची चिंता

नवी दिल्ली : देशाच्या अनेक राज्यात कोविड-19 चा प्रकोप सतत वाढत चालला आहे. केरळात मंगळवारी पाच हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली. तर दिल्लीत भाजपा नेत्याने मास्क न घातल्यास 2,000 रुपये दंड वसूल करण्याच्या नियमाला आक्षेप घेतला आहे. केरळच्या आरोग्य विभागानुसार, मंगळवारी आणखी 5,420 लोकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्यात आतापर्यंत एकुण कोविड-19 रूग्णांची संख्या वाढून 5,71,641 झाली आहे. तर, राज्यात मागील 24 तासात 5,149 लोकांनी कोरोनावर मात केली आहे, यामुळे एकुण बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 5,05,238 झाली आहे.

केरळात सध्या 64,412 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आणखी 24 लोकांच्या मृत्यनंतर राज्यात आतापर्यंत एकुण 2,095 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळात वेगाने वाढणारी प्रकरणे पाहता मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. सोबतच रेस्टॉरंट आणि टपरीधारकांना गर्दी होऊ देऊ नये, असे आवाहन केले आहे.

तर कर्नाटकच्या आरोग्य विभागाने दिलेल्या महितीनुसार राज्यात 17 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील 24 तासात कोरोना व्हायरसची एकुण 1,870 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासोबतच राज्यात कोरोनाने संक्रमित होणार्‍यांची एकुण संख्या वाढून 8,76,425 झाली आहे. या कालावधीत 1,949 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत एकुण 8,40,099 रूग्ण बरे झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये 431 नवीन कोरोना संक्रमित
केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी 431 नवीन लोक कोरोना ग्रस्त आढळले. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकुण संक्रमितांची संख्या आणि मृतांची संख्या अनुक्रमे 1,07,330 आणि 1,651 झाली आहे.

पंजाबमध्ये 24 तासात 22 लोकांचा मृत्यू
पंजाबमध्ये मागील 24 तासात 22 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची एकुण संख्या वाढून 4,653 झाली आहे. तर 614 नवीन प्रकरणे समोर आली आहे. पंजाबच्या राज्यपालांचे मुख्य सचिवसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

गुजरातमध्ये मंगळवारी कोरानाचे 1,510 नवीन रूग्ण सापडले. तर पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे आणखी 49 लोकांचा मृत्यू झाला आणि मागील 24 तासात 3,545 नवीन रूग्ण सापडले आहेत. गोव्यात सुद्धा 167 नवी प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 939 नवीन रूग्ण सापडले आहेत.

You might also like