स्वदेशी ! खादीनं सादर केला रेशीम मास्कचा गिफ्ट बॉक्स, घरबसल्या 500 रूपयांमध्ये करा खरेदी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाद्वारे (KVIC) तयार केलेल्या एक गिफ्ट बॉक्स सादर केला, ज्यात हाताने बनविलेले चार रेशमी मास्क आहेत. केव्हीआयसीच्या गिफ्ट बॉक्समध्ये मास्क आहेत, जे हाताने बनवलेल्या ब्लॅक पेपर बॉक्समध्ये ठेवलेले आहेत आणि त्यावर सोनेरी नक्षीदार मुद्रण आहे. या गिफ्ट बॉक्सची किंमत 500 रुपये आहे आणि ती दिल्ली-एनसीआरमधील सर्व केव्हीआयसी रिटेल दुकानात उपलब्ध आहे. एमएसएमई मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, गडकरींनी गिफ्ट बॉक्सची प्रशंसा केली आणि म्हणाले की, सुरक्षेसह उत्सव साजरा करण्यासाठी हे परिपूर्ण उत्पादन आहे.

केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले की, गिफ्ट बॉक्स सादर करण्यामागील हेतू हा परदेशी बाजाराची मागणी पूर्ण करणे आहे, कारण उत्सवाच्या या काळात तेथील मोठ्या संख्येने भारतीय लोक आपल्या प्रियजनांना योग्य किमतीचे भेट देऊ इच्छितात. गिफ्ट बॉक्समध्ये मुद्रित रेशीम मास्क आणि तीन इतर मास्क आकर्षक रंगात असतील. हे तीन लेयरचे रेशीम मास्क त्वचेच्या -अनुकूल, धुण्यायोग्य, पुन्हा वापरण्यास योग्य आणि नैसर्गिकरित्या विघटनक्षम आहेत. रेशीम मास्कमध्ये तीन रेशीम असतात आणि कानातील लूप सहजपणे समायोजित केली जाऊ शकते. यात 100% खादी सूती फॅब्रिकचे दोन आतील स्तर आहेत आणि रेशीम फॅब्रिकचा वरचा थर आहे.

येथून खरेदी करू शकता मास्क –
खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) कापूस आणि रेशीमचे मास्क विकत आहे. कॉटन मास्कची किंमत 30 रुपये ठेवली आहे, तर रेशीम मास्क 100 रुपये असेल. खादी मास्कसाठी http://www.kviconline.gov.in/khadimask वर ऑर्डर देता येते. खादी चार प्रकारचे मास्क विकत आहे. यामध्ये ब्लॅक पाईपिंगसह पांढरा कॉटन मास्क, तिरंगा पाईपिंगसह पांढरा कॉटन मास्क, सॉलिड कलरमध्ये सिल्क मास्क आणि मल्टीपल कलर प्रिंटेड सॉलिड मास्कचा समावेश आहे. ऑर्डर दिल्यानंतर 5 दिवसात केव्हीआयसी विनामूल्य मास्क वितरित करेल.