Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली

लखनौ (Lucknow) : Covid-19 | राज्यातील नवीन कोविड १९ (Covid-19) चा संसर्ग कमी झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने चित्रपटगृहे, मल्टिफ्लेक्स, जिम आणि स्टेडियम ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास सोमवारपासून परवानगी दिली आहे. त्याचवेळी कर्नाटकात मंदिरे आजपासून उघडण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासात १२८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. येथील पॉझिटिव्हीटी दर ०.०६ टक्के इतका खाली आला आहे. सध्या राज्यात २ हजार २६४ सक्रीय रुग्ण आहे. बरे होण्याचा दर ९८.५ टक्के झाला आहे. हे सर्व लक्षात घेऊन राज्य सरकारने निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक सरकारने सर्व धार्मिक स्थळांमध्ये दर्शन व प्रार्थनेला आजपासून परवानगी दिली आहे. कोविड १९ च्या नियमांचे पालन करुन मंदिर, मशिदी, चर्च व सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांना परवानगी देण्यात आली आहे. केवळ दर्शन आणि प्रार्थनेसाठीच ही परवानगी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून पाटसला दुहेरी खून; तलवारीने सपासप वार करून आणि दगडाने ठेचून संपवलं

Murder at Mumbai’s Dahisar Jewelers | मुंबईच्या दहिसरमधील ज्वेलर्सला भरदिवसा गोळ्या घालून दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराला मध्यप्रदेशातून अटक

Petrol Price in Pune Today | पेट्रोलच्या दरात 6 दिवसात तिसर्‍यांदा भाववाढ; जाणून घ्या आजचे दर

MPSC Student Swapnil Lonkar Suicide Case | पुण्यातील स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला आली जाग, घेतला मोठा निर्णय

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Covid-19 | Multiflexes, gyms and stadiums opened in Uttar Pradesh and temples in Karnataka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update