Coronavirus : मुंबईत गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 56 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आज विक्रमी रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. मुंबईत गेल्या 24 तासामध्ये 1498 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट समजल्या गेलेल्या धारावीमधून समाधानकारक आकडे येत आहेत. मुंबईत कोरोना बाधित रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

मुंबईत गेल्या 24 तास 1498 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 97 हजार 751 इतकी झाली आहे. तर 56 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईत 5520 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 707 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 68 हजार 537 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईमध्ये 23 हजार 694 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईतील धरावी झोपडपट्टीत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत आहे. आज धारावीमध्ये केवळ 13 रुग्ण आढळून आले असून धारावीत 2428 कोरोना बाधित रुग्ण आले आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 8641 रुग्ण आढळून आले आहेत. तर 266 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 84 हजार 281 इतकी झाली असून राज्यात रुग्ण वाढीचा दर 19.65 टक्के झाला आहे.