Coronavirus : गेल्या 24 तासात मुंबईत 1174 नवीन ‘कोरोना’ रुग्ण तर 47 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक झाला आहे. मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लाखाच्या जवळ पोहचली आहे. मुंबईत गेल्या 24 तासामध्ये 1174 रुग्ण आढळून आले आहेत. तर 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे मृत्यू मागील 48 तासातील आहेत.


मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये वाढ होत असून मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 93 हजार 894 इतकी झाली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या 24 तासात 750 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 65 हजार 622 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईमध्ये 22 हजार 939 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईत जिल्ह्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 51 दिवसावर पोहचले आहे. मुंबईत 47 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईमध्ये 5332 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 37 रुग्णांमध्ये अतिजोखमीचे आजार होते. मृतामध्ये 31 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 6 रुग्णांचे वय 40 वर्षाच्या आतील आहे. 28 रुग्ण हे 60 आणि त्यावरील वयोगटातील आहेत. तर 13 रुग्ण हे 40 ते 60 वयोगटातील आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like