‘सिप्ला’,’हेटेरो’नंतर ‘या’ कंपनीने भारतात लाँच केले ‘कोरोना’चे औषध DESREMTM, इतकी आहे किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्लोबल फार्मास्युटिकल कंपनी Mylan ने सोमवारी कोविड-१९ ची गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी भारतात ‘DESREMTM’ या ब्रँड नावाने आपल्या रीमाडेसिविरच्या कमर्शियल लाँचची घोषणा केली. हेटेरो ड्रग्स लिमिटेड आणि सिप्ला लिमिटेडनंतर लाँच करण्यात आलेले हे तिसरे परवानाकृत जेनेरिक औषध आहे. या औषधास जूनच्या सुरूवातीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मान्यता दिली होती. Mylan ने आपल्या जेनेरिक रेमेडिसिवीरची पहिली तुकडी जारी केली आणि औषधांची वाढती मागणी लक्षात घेता देशभरात आपला पुरवठा वाढवणार असल्याचे म्हटले.

ग्लोबल फार्मा कंपनी बेंगळुरूमध्ये आपल्या इंजेक्टेबल सुविधेवर DESREMTM तयार करेल. Mylan भारतात औषधाचे मार्केटिंग करेल आणि इतर बाजारात निर्यातही करेल. यासाठी त्यांनी गिलियड सायन्सेस इंककडून टी परवाना मिळवला आहे.

गिलियडने भारतासह १२७ निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात आपल्या नॉवेल औषधाचे जेनेरिक लायसन्स आणि त्याच्या विक्रीसाठी मेमध्ये Mylan, सिप्ला, हेटेरो ड्रग्स, जुबिलेंट लाइफ सायन्सेस लिमिटेड आणि पाकिस्तानस्थित फिरोझन्स लॅबोरेटरीज लिमिटेडसह एका सामान्य करारावर स्वाक्षरी केली होती. नंतर इतर चार कंपन्यांसह समान करारावर स्वाक्षरी केली, जेणेकरून महत्वपूर्ण औषधापर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकेल.

किती असेल किंमत?
सिप्लाने आपल्या रेमेडिसिवीर ‘Cipremi’ ची किंमत प्रति कुपी ४,००० रुपये ठेवली आहे, तर हेटेरो ड्रग्सने ‘कोविफर’ (Covifor) ची किंमत प्रति कुपी ५,४०० रुपये ठेवली आहे. Mylan ने आपल्या उत्पादनाची किंमत प्रति पीस ४,८०० रुपये ठेवली आहे. रेमेडिसिवीरसह उपचारात औषधाच्या सहा कुपी समाविष्ट आहेत.

अमेरिकन फार्मा गिलियडने वैकल्पिक औषधाचा शोध होईपर्यंत फार्मा कंपन्यांना रॉयल्टी मुक्त तत्त्वावर परवाना दिला आहे किंवा जागतिक आरोग्य संघटना जोपर्यंत कोविड-१९ ला सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन समाप्तीची घोषणा करत नाही, तोपर्यंत परवाने रॉयल्टीमुक्त आहेत किंवा कोरोना महामारीला रोखण्यासाठी रेमेडिसिवीर ऐवजी कोणतेही औषधी उत्पादन किंवा लस मंजूर होत नाही, किंवा या दोन्हपैकी जे प्रथम होईल. यासह कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांची किंमत निश्चित करण्याची सूट दिली आहे.