COVID-19 : देशात ‘कोरोना’बधितांचा आकडा 70 लाखांच्या पुढे, 24 तासात 74383 नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे केंद्र सरकार अनलॉकची प्रक्रिया वेगाने राबवत असताना दुसरीकडे देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाच्या नव्या प्रकरणांत थोडा दिलासा मिळाला असला तरी मागील 24 तासात आलेल्या नव्या केसनंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 70 लाखांच्या पुढे गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, मागील 24 तासात कोरोनाच्या 74 हजार 383 नव्या केस समोर आल्या आहेत, तर 918 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात नव्या कोरोना केस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची एकुण संख्या 70,53,807 झाली आहे. शनिवारी देशात 73,272 नव्या केस समोर आल्या होत्या, तर 926 रूग्णांचा मृत्यू झाला होता.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 60 लाख 77 हजार 977 लोक बरे झाले आहेत, तर देशातील विविध हॉस्पीटल्समध्ये 8 लाख 67 हजार 496 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूंनंतर देशातील एकुण मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 8 हजार 334 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासांच्या आत 10,78,544 कोरोना तपासण्या करण्यात आल्या.

कोरोनामुळे महाराष्ट्र देशात सर्वात प्रभावित राज्य आहे. महाराष्ट्रात शनिवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 11,416 नवी प्रकरणे समोर आली, ज्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या वाढून 15,17,434 झाली आहे. मागील 24 तासात 308 लोकांचा मृत्यू झाला आणि मृतांची एकुण संख्या वाढून 40,040 झाली. बरे झाल्याने 26,440 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. एकुण बरे होणार्‍या रूग्णांची संख्या 12,55,779 आहे. राज्यात आता 2,21,156 लोकांवर उपचार सुरू आहेत.

गुजरातमध्ये कोरोना प्रकरणे दिड लाखाच्या पुढे
गुजरातमध्ये शविारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 1,221 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात एकुण संक्रमितांची संख्या 1.5 लाखाच्या पुढे जाऊन 1,50,415 झाली आहे. कोविड-19 मुळे आणखी 10 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची एकुण संख्या वाढून 3,560 झाली आहे. राज्यात 1,456 रूग्ण बरे झाल्यानंतर एकुण बरे होणार्‍या रूग्णांची संख्या वाढून 1,30,897 झाली आहे.