COVID-19 : देशात ‘कोरोना’बधितांची संख्या 81 लाखांच्या पुढे, 24 तासात आल्या 48,268 नव्या केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरस(covid 19)ने संक्रमित रूग्णांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत आहे. कोरोना(covid 19)च्या नव्या केसमध्ये थोडा दिलासा जरूर मिळाला आहे, परंतु मागील 24 तासात आलेल्या नव्या केसनंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 81 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार मागील 24 तासात कोरोनाच्या 48 हजार 268 नव्या केस समोर आल्या आहेत, तर 551 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात नव्या कोरोना केस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 81,37,119 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 74 लाख 32 हजार 829 लोक रिकव्हर झाले आहेत, तर देशाच्या विविध हॉस्पीटलमध्ये 5 लाख 82 हजार 649 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूनंतर देशात मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 21 हजार 641 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासांच्या आत 10,67,976 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

देशात अजूनही कोरोनाने सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्ट्रच असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 6,190 नवी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यानंतर राज्यात यामुळे संक्रमित होणार्‍या लोकांची एकुण संख्या शुक्रवारी वाढून 16,72,411 झाली आहे. आरोग्य विभागानुसार, राज्यात मागील 24 तासात 127 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे राज्यात कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या एकुण लोकांची संख्या वाढून 43,837 झाली आहे.