Covid-19 : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय खावं अन् काय नाही हे WHO नं सांगितलं, जाणून घ्या

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा सर्वांच्या संकटांमध्ये वाढ केली आहे. कोरोनाचे नवीन रूप अत्यंत घातक आहे आणि जरासेही दुर्लक्ष या साथीला आमंत्रण देण्यासारखे आहे. वारंवार हात धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर ठेवण्यासोबत तुम्हाला खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या वातावरणात चांगले न्यूट्रिशन आणि हायड्रेशन इम्यून सिस्टीमला मजबूत बनवते, ज्यामुळे गंभीर आजार आणि संक्रमण यांचा धोका कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की कोरोना या आजारापासून वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा डायट केला पाहिजे.

कोरोनापासून वाचण्यासाठी कसा असावा डायट प्लॅन:
तुम्हाला तुमच्या डायटमध्ये अनेक प्रकारची ताजी फळे आणि अनप्रोसेस्ड अन्नाचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, प्रोटीन आणि ऍन्टी ऑक्सिडंट मिळू शकतात.

खूप सारी फळे, भाज्या, डाळी, बीन्स यांसारख्या शेंगांचा, नट्स आणि मका, बाजरी, ओट्स, गहू, ब्राऊन राईस, कंदमुळे जशी की बटाटे, रताळे अशा पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय मास, मासे, अंडी आणि दूध यांचा डाएटमध्ये समावेश करावा.

दररोज कमीत कमी २ कप फळे (४ सर्व्हिंग्ज), २.५ कप भाज्या (५ सर्व्हिंग्ज ), १८० ग्रॅम धान्ये आणि १६० ग्रॅम मास आणि बीन्स खावे. आठवड्यात १-२ वेळा लाल मास आणि २-३ वेळा चिकन खाऊ शकता. संध्याकाळी हलकी भूक लागण्यानंतर काच्या भाज्या आणि ताजी फळे खाणे. भाज्या शिजवून खाऊ नका अन्यथा त्यातील आवश्यक पोषक घटक निघून जातील. आपण बंद डब्यातील फळे घेतल्यास या गोष्टीची काळजी घ्या की त्यामध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त नसेल.

पाण्यावर लक्ष द्या:
शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. हे रक्तात पोषक तत्वांना पोहचवते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते आणि शरीरातून विषारी घटकांना बाहेर टाकते. दररोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याशिवाय तुम्ही फळांचा ज्यूस आणि लिंबू पाणी पिऊ शकता. सॉफ्ट ड्राइंग, कोल्ड ड्रिंक, सोडा आणि कॉफीचे प्रमाण कमी ठेवा.

अनसॅच्युरेटेड फॅक्ट्स:
चरबीयुक्त मासे, लोणी, नारळ तेल, साय आणि तूप यामध्ये आढळणारे सॅच्युरेटेड फॅटऐवजी अनसॅच्युरेटेड फॅक्ट्स जसे की अनसॅच्युरेटेड फॅक्ट्स असणारे मासे, एवोकाडो, नट्स, ऑलिव्ह ऑइल, सोया, कैनोला, सूर्यफूल आणि कॉर्न ऑइल यांचा समावेश करावा. लाल मास खाण्याऐवजी पांढरे मास आणि मासे खावे कारण त्यामुळे चरबी वाढत नाही. प्रक्रिया केलेले मास अजिबात खाऊ नये.

बाहेरचे खाणे टाळा:
कोरोना एकमेकांच्या संपर्कात येऊन वेगाने पसरतो. हे टाळण्यासाठी बाहेर जाण्याऐवजी घरीच खा. तसे, आता बऱ्याच राज्यांनी रेट्रोरंटला बंदी घातली आहे. जरी लोक बाहेरून अन्न मागवून खाऊ शकत असले तरी ते न खाता घरचे अन्न खा.

या गोष्टींपासून अंतर ठेवा:
लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह आणि अनेक प्रकारचे कर्करोग टाळण्यासाठी साखर, फॅट आणि मीठ यांचे सेवन कमी करा. दिवसभरात १ चमचापेक्षा जास्त मीठ खाऊ नका.

जितके होऊ शकते तितके ट्रांस फॅटपासून दूर रहा. प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, स्नॅक्स फूड, फ्राईड फूड, फ्रोजन पिज्जा, कुकीज आणि क्रीम यामध्ये ट्रांस फॅट आढळते. इतर कोणत्याही रोगामुळे कोरोना व्हायरस होण्याची शक्यता वाढते. म्हणून स्वतःला पूर्णपणे निरोगी ठेवा.

पौष्टिक अन्न आणि योग्य हायड्रेशन आरोग्य आणि रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी मदत करते, जे लोक आधीपासून आजारी आहेत अथवा ज्यांना कोरोना झाला आहे त्यांना मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जर तुम्हाला मानसिकरीत्या बरे वाटत नसल्यास मानसोपचार तज्ञाशी संपर्क साधा.