नेटवर्क शोधत गेली जंगलात, असा केला ऑनलाइन क्लास

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या असून शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु असतानाही शाळा मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अजूनही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. पण विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, अनेक भागांमध्ये अजूनही मोबाईल नेटवर्क पोहोचले नाही. अशातच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. घरात नेटवर्क नसल्यामुळे शिकण्यासाठी मुलगी जंगलात गेली होती. त्यानंतर तिने ऑनलाइन क्लासचे धडे घेतले आहेत. त्यामुळे तिचे नेटकर्‍यांनी कौतुक केले आहे. देव प्रकाश मीना असे या मुलीचे नाव आहे.

बारावीचा क्लास करण्यासाठी देवमीना रोज गावापासून दूर जंगलात जात आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 तब्बल 12 तास ती जंगलात एकटीच अभ्यास करून पुन्हा घरी परतत आहे. ऊन-पाऊस संकटे आणि इतर गोष्टींचा विचार करून चार भावांनी तिच्यासाठी जंगलात एक छोटेसे घर उभे केले आहे. इथे 12 तास बसून ही मुलगी अभ्यास करत असल्यामुळे तिचेसोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. मुलीच्या धाडसासह शिक्षण्याच्या जिद्दीचे अनेकांनी खूप कौतुक केले आहे. याच बरोबर सरकारच्या अपुर्‍या पडणार्‍या सोयीसुविधांवरही टीका केली आहे. कोरोनाच्या काळात आजही अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात आहे.