COVID-19 : Outstanding ! ‘कोरोना’च्या काळात वृद्धांची सेवा करण्यासाठी ‘या’ प्रसिद्ध मॉडेलनं सोडलं ‘मॉडेलिंग’

पोलिसनामा ऑनलाइन –लंडनमधील एका प्रसिद्ध मॉडेलनं कोरोना व्हायरसच्या काळात वृद्धांची सेवा करण्यासाठी आपली मॉडेलिंग सोडली आहे. तिनं खुलासा केला आहे की, एक महिना आधीच तिनं केअर होममध्ये वृद्धांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. इंस्टावरून या मॉडेलं एक पोस्टही शेअर केली आहे.

वृद्धांसाठी आपली शानदार मॉडेलिंग सोडणाऱ्या मॉडेलचं नाव आहे हॅरिएट रोज जॉन (Harriet Rose John). हॅरिएट रोज जॉन (Harriet Rose John) ही लंडनमधील खूप फेमस मॉडेल आहे. हॅरिएटनं सांगितलं की, तिनं एक महिना आधीच होम केअर जॉईन केलं आहे. खास बात अशी की, देखभाल करण्यासाठी तिच्याकडे आलेल्या एकाही रुग्णाचा अद्याप मृत्यू झालेला नाही. यासाठी ती खूप लकी आणि हे तिच्यासाठी मोठं यश आहे असंही ती सागंते. तिनं सर्वांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्यास आणि नियमित हात धुण्यास सांगितलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचही तिनं कौतुक केलं आहे. ज्या होम केअरमध्ये ती सेवा देत आहे, तिथलं नाव मात्र या मॉडेलनं काही सांगितलं नाही. तिनं इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हॅरिएटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं डोल्से आणि गबाना साठी रॅम्पवर कॅटवॉक केलं आहे. डोल्से आणि गबाना इटलीतील फॅशन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव आहे. तिनं लंडनमधील अनेक टॉपच्या एजन्सीजसाठी करार केला आहे. तिनं अनेक मॅगेझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशुट केलं आहे.

https://www.instagram.com/p/B76nipQna7_/