Coronavirus Vaccine : वॅक्सीन आल्यानंतर किती कमी होणार ‘कोरोना’च्या संसर्गाचा धोका आणि भीती ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीनं तयार केलेली कोरोना वॅक्सीनची पहिल्या दोन टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी पार पडली. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करण्यात येणार असून त्या निरीक्षणानंतर हे वॅक्सिन बाजारात उपलब्ध होणार आहे. WHO च्या दाव्यानुसार कोरोनाची लस उपलब्ध होण्यासाठी किमान 2021 साल उजाडेल. तर मार्चपर्यंत ही लस बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकेल असा दावा पुण्याच्या सीरम कंपनीचे सीईओ पुनावाला यांनी केला आहे.

ऑक्सफोर्ड व्यतिरिक्त रशिया आणि चीन या दोन देशांनी देखील कोरोनावरील वॅक्सिन तयार केली आहे. या दोन देशांच्या वॅक्सीनही अंतिम टप्प्यात आल्या असून त्यावर निरीक्षण सुरु आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनासाठी संपूर्णपणे वॅक्सीनवर अवलंबून राहता येणार नाही. अंतिम टप्प्यातील निरीक्षण आणि प्रत्यक्षात उपलब्ध झाल्यानंतरही सुरुवातीच्या टप्प्यात येणारी आव्हाने यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत.

वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार, कोरोनाविरुधातील हे वॅक्सीन केवळ विषाणू किंवा आजाराची गंभीरता कमी करण्याचे काम करु शकतं. म्हणजेच या वॅक्सीनमुळे कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. हे वॅक्सीन सुरक्षीत आहे. हे वॅक्सीन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात इम्युनिटी वाढवतं. एक हजार वॉलेंटियर्सवर केलेल्या चाचणीवर अभ्यास केल्यानंतर हे परिक्षण समोर आलं आहे.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोना फैलाव वेगाने होत आहे. हा फैलाव कमी करण्यासाठी वॅक्सीन कमी होईल अशी अपेक्षा वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या घडीला हे वॅक्सीन कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबवेल असं म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण अजूनही अनेक आव्हान पार करायची असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.