‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत आता दिलासा मिळण्याची वेळ आलीय का ? जाणून घ्या काय म्हणाले ऑक्सफोर्डचे टॉप सायंटिस्ट
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणखी एक चांगली बातमी आली आहे. कोरोनासाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसह मिळून वॅक्सीन बनवत असलेल्या एस्ट्राजेंकाने म्हटले आहे की, त्यांनी तयार केलेली वॅक्सीन ट्रायलदरम्यान 90 टक्के सुरक्षा देण्यात यशस्वी ठरली आहे. यासाठी प्रयोगादरम्यान वॅक्सीनचा अर्धा डोस देण्यात आला, याच्या सुमारे एक महिन्यानंतर वॅक्सीनचा फुल डोस देण्यात आला.
इंडिया टुडे टीव्हीचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे वॅक्सीनलॉजिस्ट एड्रियन हिल यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. एड्रियन हिल ऑक्सफोर्ड विद्यापीठात ह्यूमन जेनेटिक्सचे प्रोफेसर आहेत.
प्रश्न : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता आनंद व्यक्त करण्याची वेळ आली आहे का?
एड्रियन हिल : होय आपण आनंदी होऊ शकतो, आम्ही ट्रायलच्या दरम्यान ज्या लोकांना वॅक्सीन दिली, त्यांना आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली नाही. यासाठी आम्ही वन डोसची पद्धत अवलंबली. यामध्ये पहिला वॅक्सीनचा अर्धा डोस दिला जातो, यानंतर जवळपास महिनाभरानंतर दुसरा पूर्ण डोस दिला जातो. याच्याऐवजी आम्ही एक महिन्याच्या अंतराने दाेन पूर्ण डोस वॅक्सीनच्या रूपात देऊ.
याचा फायदा हा होईल की, आम्ही जास्त लोकांना लस देऊ शकतो, मला वाटते ही खरोखर चांगली बातमी आहे की, जगात यावेळी तीन परिणामकारक वॅक्सीन अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये एस्ट्राजेन्काशिवाय मॉडर्ना आणि फायजरच्या वॅक्सीनचा समावेश आहे.
प्रश्न : हे बोलणे योग्य आहे का की, ऑक्सफोर्ड वॅक्सीनच्या साठ्यासाठी खूप जास्त कोल्ड स्टोरिंगची गरज भासत नाही?
उत्तर : होय, तुम्हाला वॅक्सीन फ्रिजच्या तापमानावर ठेवण्याची आवश्यकता असते, अनेकदा डीप फ्रिज करावी लागते. जगभरात तिचे वितरण सध्याच्या वॅक्सीन सिस्टिमप्रमाणे करता येईल.
प्रश्न : या वॅक्सीनची संभाव्य किंमत काय असू शकते?
उत्तर : उच्च उत्पन्नवाल्या देशांमध्ये महामारीच्या दरम्यान तिची किंमत 3 डॉलर प्रतिवॅक्सीन असण्याची शक्यता आहे. महामारीनंतर कमी उत्पन्न वर्गातील देशांमध्ये किंमत तेवढीच राहण्याची अपेक्षा आहे, परंतु श्रीमंत देशांत वॅक्सीन निर्माते काही फायदा कमावू शकतात.
प्रश्न : आपत्कालीन वापरासाठी वॅक्सीन कधी तयार होईल. (कोरोना वॉरियर्ससाठी)
उत्तर : आम्ही लवकरच आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागू. आम्ही भारतात आमचे पार्टनर सिरम इन्स्टिट्यूट आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्यासोबत काम करत आहोत, आम्ही लवकरच पुढे जाऊ. जानेवारीच्या सुरुवातीच्या दिवसांपर्यंत आमचे लक्ष्य आहे, परंतु सामूहिक स्तरावर लसीकरणासाठी अजून काही वेळ लागू शकतो. भारत एक मोठा देश आहे, परंतु सिरमसुद्धा जगातील सर्वांत मोठी वॅक्सीन निर्माता कंपनी आहे.
प्रश्न : वॅक्सीन बनण्यासाठी खूप वेळ लागतो, तुम्ही इतक्या लवकर यश कसे मिळवले?
उत्तर : आमच्या विद्यार्थ्यांना यामध्ये 10 वर्षे लागले असते, आम्ही आता 10व्या महिन्यात आहोत, ती पहिल्याच्या पद्धतीपेक्षा अनेक बाबतीत वेगळी होती. यावेळी फंड लावणार्यांनी, नियामक संस्थांनी, आंतरराष्ट्रीय एजन्सींनी मदत केली आहे. अनेकदा आम्हाला क्लिनिकल प्रोसेसला ओव्हरलॅप करण्याची परवानगी मिळाली आहे. सुमारे 270 लोकांनी रात्रंदिवस काम केले आहे. याशिवाय केवळ ब्रिटनमध्ये 19 ठिकाणी ट्रायल होत आहेत, ब्राझीलमध्ये 10,000 लोकांना वॅक्सीन देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेतसुद्धा प्रक्रिया सुरू आहे. अमेरिकेत 10 हजार लोकांना वॅक्सीन दिली आहे. केनियाने सुरू केली आहे. भारतात सिरम करत आहे.
प्रश्न : तुम्ही या यशाचा जल्लोष सुरू केला आहे का?
उत्तर : आम्ही अजूनपर्यंत फिनिशिंग लाइनपर्यंत पोहाेचलेलो नाही, परंतु आम्ही अडथळा पार केला आहे. पुढील काही आठवडे कागदपत्रांच्या कामकाजाचे असतील, जे खूप व्यस्त राहणार आहेत, आम्हाला आशा आहे की, आम्ही वर्षाच्या अखेरपर्यंत जल्लोष साजरा करू.