दहशतवाद्यांना ‘कोरोना बॉम्ब’ बनवून भारतात पाठविण्याच्या तयारीत पाकिस्तान, करतंय ‘कुरघोड्या’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगातील बरेच लहान – मोठे देश सध्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याच्या कामात गुंतलेली आहेत. परंतु पाकिस्तान अद्यापही त्याच्या वाईट कृत्ये करण्यापासून सुधारला नाही. स्वतः देखील कोरोनाच्या विळख्यात असताना रोज सीज फायरचे उल्लंघन करीत आहे. त्यात आता एलओसीजवळ लॉन्चिंग पॅडवर जमा असलेल्या दहशतवाद्यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. हे दहशतवादी भारतात कश्या प्रकारे प्रवेश करू शकतील, यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करीत आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी एलओसीलाही आग लावण्यात आली आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनंतर पाकिस्तानची ही कुरघोडी उघडकीस आली.

मार्चमध्येच पाकिस्ताकडून 411 वेळा युद्धबंदीचा भंग
शुक्रवारी पाकिस्ताननेही भारतीय सुंदरबानी भागात सैन्याच्या चौकीला लक्ष्य केले. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत. आकडेवारी पाहिल्यास मार्च महिन्यात पाकिस्तानने 411 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. आणि 2020 मध्ये आतापर्यंत तीन महिन्यांत 1160 पेक्षा जास्त वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे. हे उल्लंघन सुरूच आहे. गेल्या वर्षी, 2019 मध्ये पाकिस्तान सैन्याने पहिल्या तीन महिन्यांत 685 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. जर आपण पाकिस्तान सैन्यात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांबद्दल बोललो तर आतापर्यंत 40 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात पाकिस्तान लष्कराचे बरेच अधिकारीही आहेत. तर 860 पेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन केले आहे.

पंजाब प्रांतातील एलओसीवरून पाक सैन्याने घेतली माघार
पाकिस्तानमधील कोरोनाचे संकट इतके वाढले आहे की स्वत: इम्रान खान यांनीही हात वर केले आहेत. माहितीनुसार, आरोग्य आणि उपचारांच्या अयोग्यतेमुळे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैन्य एलओसी मधून काढून वेगवेगळ्या भागात तैनात केले जात आहे. पाकिस्तानमधील सर्वाधिक शक्तिशाली प्रांत पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बहुतेक आयसिलेशन सेंटर पीओके मध्ये बांधली गेली आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तान त्या दहशतवाद्यांना लॉन्चपॅडवर ठेवू शकत नाही किंवा त्यांना त्यांच्या घरी जाऊ देऊ शकत नाही आणि त्यांच्यावर तर उपचार अजिबात करू इच्छित नाही. त्या कोरोना-संक्रमित अतिरेक्यांकडून पाकिस्तान लष्कराच्या सैनिकांनाही धोका आहे, अशा प्रकारे पाकिस्तान त्या संक्रमित दहशतवाद्यांना भारतात ढकलण्याची स्थितीत आहे आणि सतत युद्धबंदीचे उल्लंघन करीत आहे.