‘या’ देशात 24 तासासाठी लागू केला ‘स्मार्ट’ लॉकडाऊन, असा झाला फायदा

इम्लामाबाद : वृत्तसंस्था – कोरोना रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यातच आता काही देशांनी शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. शिथिलता देण्यात सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता स्मार्ट लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील 1292 परिसरामध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी 24 तासांचा स्मार्ट लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटर यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. यापूर्वी पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले होते की, देशात कोरोनाबाधितांचा आणि मृत्यांचा आकडा वाढत आहे.

NCOC नं दिलेल्या माहितीनुसार या स्मार्ट लॉकडाऊनमुळं एकूण 3 लाख 8 हजार 600 लोकं प्रभावित झाले. राजधानी इस्लामाबादसह कराचीच्या जी 9/2 आणि जी 9/3 मध्ये स्मार्ट लॉकडाऊन लागू केला गेला. फोरमला सांगण्यात आले की राजधानी इस्लामाबादच्या एकूण 10 क्षेत्रांतील 60 हजार लोकसंख्या स्मार्ट लॉकडाऊन अंतर्गत आहे.

अधिकाऱ्यांना सूचना
अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, स्मार्ट लॉकडाऊनमध्ये मुख्यत: ट्रॅक, ट्रेस आणि क्वारंटाईन ठेवणं हे धोरण लागू केलं जातं. याशिवाय आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना आणि विशेषत: कार्यस्थळे, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक, बाजारपेठ आणि दुकाने यांचे पालन करणे गरजेचे आहेत.

भारतासारखा लॉकडाऊन नाही – इमरान खान
यापूर्वी इमरान यांनी सांगितले की, मला सांगायचे आहे की आमच्यावर कोणताही दबाव नाही. तसेच आम्ही भारतासारखा देशांप्रमाणे लॉकडाऊन लागू केलेला नाही. त्यांनी सांगितले की, पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठ, शिकागो विद्यापीठ इत्यादी तज्ज्ञांनी सर्वेक्षण केले आहे. यामध्ये दिसून आले आहे की, भारतातील 84 टक्के लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आणि 34 टक्के कुटुंबे आर्थिक मदतीशिवाय त्यांच्या दैनंदिन गरजा भागवू शकत नाही. असेही समजतेय की 30 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहे. मात्र, कोरोनामुळे श्रीमंत वर्गाला कोणताही त्रास झाला नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भारतासारखा लॉकडाऊन नाही.