कोरोना लढ्यात क्रिकेटर मदतीसाठी पुढे ! सनरायझर्स हैदराबादची 30 कोटींची मदत; CSK कडून राज्य सरकारला 450 ऑक्सिजन सेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने हाहाकार केला आहे. कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्ययंत्रणावर अधिक ताण पडला आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्राणवायू, बेड, रेमडीसीव्हीर अशा अनेक गोष्टीची कमतरता जाणवत आहे. यामुळे अनेक लोकांचा प्राण जात आहे. या परिस्थितीमुळे अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. तसेच क्रिकेट क्षेत्र आयपीएल संघ सुद्धा मदतीसाठी पुढे सरसावला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) तामीळनाडू सरकारला जवळपास ४५० प्राणवायू संच देण्याची घोषणा केलीय. तर सनरायझर्स हैदराबादने सोमवारी दुसऱ्या लाटेत होरपळलेल्यांसाठी तब्बल ३० कोटींची मदतीचा निर्णय घेतला आहे.

भारतातील कोरोनाचे संकट पाहता अनेकजण मदतीसाठी धावत आहेत. तसेच जादातर क्रिकेटर यांनी कोरोनाच्या काळात मदतीसाठी दोन हात केले आहेत. तसेच म्लास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने १ कोटी, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स यांनी ३७ लाख, ब्रेट ली- ४० लाख, या खेळाडूंनी आपल्या तऱ्हेने कोरोना महामारीत मदतीला धावून आले आहेत. भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली आणि पत्नी अऩुष्का शर्मा यांनी दोन कोटींची मदत जाहीर करत Ketto बरोबर सात कोटींचा निधी गोळा करण्याचे ध्येय पुढं ठेवले. तसेच, त्यांच्या या मोहिमेत युझवेंद्र चहल यानेही ९५ हजारांची मदत केलीय, याचबरोबर भारताचा खेळाडू रिषभ पंतनेही मदतीसाठी ढवळा आहे. तर, राजस्थान रॉयल्स (RR) या टीमने देखील ७.५ कोटोची मदतीचा निर्णय घेतला आहे.