‘कोरोना’सोबत लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार ‘ही’ तुळस आणि मधाचा अर्क असलेली खास मिठाई ! कधी, कुठं अन् किती रुपयात मिळणार जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना व्हायरस देशासह जगभरात हाहाकार माजवताना दिसत आहे. अशात सर्वांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सांगितंल जात आहे आणि त्यासाठी काही औषधही दिली जात आहेत. विशेष म्हणजे ज्यांना बंगाली मिठाई आवडते त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. कोरोनापासून बचावर करण्यासाठी तुळस आणि मधाचा अर्क वापरून खास गुणकारी मिठाई बनवली गेली आहे.

गाईच्या दुधात सुंदरबनमधील मध आणि तुळशीचा अर्क वापरून तयार होणार आरोग्य संदेश

पश्चिम बंगालनं आता एक नवीन मिठाई बाजारात आणली आहे. आरोग्य संदेश असं या मिठाईचं नाव आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही मिठाई उपयोगी ठरेल. याच्या सेवनानं आजारांशी लढण्यास मदत होईल. खास बात अशी की, या मिठाईमध्ये सुंदरबनमधील मधाचा वापर केला आहे. गाईच्या दुधात हे सुंदरबनमधील मध आणि तुळशीचा अर्क वापरून ही मिठाई तयार करण्यात आली आहे अशी माहिती पशुधन संसाधन विकास विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.

कुठे मिळेल आरोग्य संदेश ?

मिठाईबद्दल आणखी बोलायचं झालं तर या मिठाईत कोणतेही कृत्रिम फ्लेवर्स वापरलेले नाहीत. कोलकाता आणि आसपासच्या जिल्ह्यात ग्राहकांसाठी ही मिठाई अपलब्ध असणार आहे.

कधी उपलब्ध होणार आरोग्य संदेश ? किती असेल किंमत ?

सुंदरबनचे मंत्री मांतुराम पखीरा यांनी सांगितल्यानुसार, आरोग्य संदेश (मिठाई) तयार करण्यासाठी पीरखली, झारखली आणि सुंदरबनच्या इतर काही ठिकाणांहून मध गोळा करण्यात आलं आहे. पुढील दोन महिन्यात ही मिठाई बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. खास बात म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल अशीच या मिठाईची किंमत असणार आहे.