Coronavirus : 21 परदेशींना आणि जमातींना पकडणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकास झाला ‘कोरोना’, राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे जिल्ह्यात  परदेशी नागरिक आणि तबलिगी जमातच्या २१ जणांना पकडलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला कोरोना विषाणुची बाधा झाल्याने त्यांना नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे नियुक्तीला आहेत. दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर तेथून २१ परदेशी नागरिक मुंब्रा येथे आले होते.

त्यात १३ बांगलादेशी व ८ मलेशियन नागरिक होते. त्यांना ताब्यात घेण्यात हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहभागी झाले होते. त्यानंतर तेथील एका डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्या संपर्कात हे पोलीस निरीक्षक आले होते. त्यामुळे त्यांना सुट्टी घेऊन घरी होम क्वांरटाईन राहण्यास सांगण्यात आले होते. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. शुक्रवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.