COVID-19 : दिल्लीसह 7 राज्यात 30% झाला पॉझिटिव्हिटी रेट, ‘या’ 30 जिल्ह्यांमध्ये स्थिती चिंताजनक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशाची कोविड स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. सरकारकडून जारी डेटा सांगतो की, मागील आठवड्यात देशातील 24 राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्केपेक्षा जास्त होता. तर, मागील दोन आठवड्यांमध्ये 30 जिल्ह्यांमध्ये प्रकरणे वेगाने वाढत आहेत. अधिकार्‍यांनी माहिती दिली की, देशात 7 राज्य अशी आहेत, जिथे मागील आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त होता. आरोग्य मंत्रालयाने हे आकडे चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहूजा यांनी म्हटले की, 7 राज्यात 30 टक्केपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट नोंदला गेला आहे. यामध्ये गोवा (48.5), हरियाणा (36.1), पुदुचेरी (34.9), पश्चिम बंगाल (33.1) आणि कर्नाटक, दिल्ली, राजस्थान (29.9) च्या नावाचा समावेश आहे. केस पॉझिटिव्हिटी या गोष्टीचा संकेत आहे की, देशात यावेळी कोरोना कसा पसरत आहे.

त्यांनी सांगितले की, सध्या केवळ तीन राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्केपेक्षा कमी आहे. तर 9 राज्यांमध्ये हा आकडा 5 ते 15 टक्के आहे. आहूजा यांनी म्हटले 24 राज्यात 15 टक्केपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आहे. हे आपल्यासाठी आणि देशासाठी चिंताजनक आहे.

देशातील 12 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये रोज सापडणार्‍या प्रकरणांमध्ये वाढ सुरू आहे. अतिरिक्त सचिवांनुसार, यामध्ये कर्नाटक, केरळ, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, हरियाणा, ओडिसा, उत्तराखंड, पंजाब, आसाम आणि हिमाचल प्रदेशचे नाव आहे.

तर, देशात 30 जिल्हे असे आहेत जिथे दर आठवड्याला प्रकरणांमध्ये मोठी वाढ दिसत आहे. यामध्ये केरळचे 10 जिल्हे – कोझिकोड, एर्नाकुलम, थ्रिसूर, मलप्पुरम, तिरुवनंतपुरम, कोट्टायम, अलप्पुझा, पलक्कड़, कोल्म आणि कन्नूर आहे. आंध्र प्रदेशचे 7 जिल्हे- चित्तूर, पूर्वी गोदावरी, श्रिकाकुलम, विशाखापट्टनम, कुर्नूल, गुंटूर आणि अनंतपुरचे नाव आहे. कर्नाटकचे तीन जिल्हे – बेंगळुरु शहर, म्हैसूर आणि टुमकुरू चे नाव आहे.