धक्कादायक ! ‘कोरोना’ पॉझिटिव्ह जवानाची लष्कराच्या रूग्णालयातच झाडाला लटकून आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सैन्याच्या जवानाने रूग्णालय आवारात असलेल्या झाडाला लटकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 31 वर्षीय जवानाचा मृतदेह मंगळवारी पश्चिम दिल्लीच्या नारायण सेनेच्या बेस रुग्णालयाबाहेर झाडाला लटकलेला आढळून आला. जवानाला कर्करोगही झाला होता, त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त दीपक पुरोहित म्हणाले, संबंधित जवानाला फुफ्फुसाचा कर्करोग होता. त्यांच्यावर उपचार केले जात होते. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे 5 मे रोजी त्यांना दवाखान्यात नेण्याआधी धौला कुआन येथील आर्मी रिसर्च अँड रेफरल (आरआर) हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

काल दुपारी एकच्या सुमारात जवानाला कोव्हिड वॉर्डमध्ये पाहणयात आले होते. त्यानंतर त्याने झाडाला लटकून आत्महत्या केली. पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली आहे. त्यात त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. पुरोहित म्हणाले की, ’त्यांच्या मृत्यूची माहिती कुटूंबाला देण्यात आली असून, त्याचे कुटुंब येताच पोस्टमार्टम केले जाणार असल्याचे सांगितले.