कोरोना संसर्गाचा धोका तब्बल 31 % कमी करेल ‘ही’ एक सवय, स्टडीमध्ये दावा

भारतात कारोनाच्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रूग्णांना श्वासाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असतानाच ऑक्सीजनची प्रचंड टंचाई भासत आहे. अशा स्थितीत प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर असंख्य लोक कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. आता एका स्टडीमध्ये समोर आले आहे की, कशाप्रकारे एक फॅक्टर तुमच्यात कोरोना संसर्गाचा धोका 30 टक्केपर्यंत कमी करू शकतो.

एक्सरसाइज केल्याने शरीर फिट राहते परंतु एका नवी स्टडीत कोरोनाशी लढण्यासाठी यास लाभदायक सांगितले आहे. हा स्टडी स्कॉटलंडच्या ग्लासगो कॅलेडोनियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. स्टडीनुसार दिवसात 30 मिनिटे, आठवड्यात 5 दिवस किंवा 150 मिनिटापर्यंत एक्सरसाइज केल्यास श्वासाचा त्रास होत नाही. स्टडीत वॉक, रनिंग, सायकलिंग आणि मांसपेशी मजबूत करणार्‍या एक्सरसाइजचा सल्ला दिला आहे.

स्टडीत म्हटले आहे की, एक्सरसाइज व्हॅक्सीनची क्षमता 40 टक्के जास्त परिणामकारक बनवते. आजाराचा धोका कमी होतो.

फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी इम्यून सिस्टमचे रक्षण करते आणि इम्यून सेल्स मजबूत करते.

हा स्टडी करणारे संशोधक लोकांना व्हॅक्सीन घेण्यापूर्वी 12 आठवडे फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी प्रोगॅम करण्याचा सल्ला देत आहेत. या एक्सरसाईज पुढील प्रमाणे…

1 ब्रिथिंग एक्सरसाइज –
ब्रिथिंग एक्सरसाइज फुफ्फुसांना मजबूत बनवते. श्वसन यंत्रणेवर कोरोनाचा परिणाम कमी होतो. लिप ब्रिथिंग एक्सरसाइज धाप लागण्याची समस्या दूर करते. फुफ्फुसांत ऑक्सीजन जास्त मात्रेत पोहचवते.

ही करण्यासाठी मान आणि खांदे एकदम सरळ ठेवून बसा. आता नाकाने हळुहळु श्वास घ्या आणि ओठ पूर्णपणे बंद ठेवा. आता ओठांना गोल करा जसे तुम्ही मेणबत्ती विझवताना करता. यानंतर यााच स्थितीत हळुहळु श्वास सोडा, ही एक्सरसाइज अनेक वेळा करा. आराम जाणवतो.

2 एरोबिक एक्सरसाइज –
एरोबिक एक्सरसाइज करा. या एक्सरसाइजमध्ये खुप जास्त एनर्जी लागते. श्वास वेगाने होतो. वेगाने चालणे, धावणे, रश्शी उडी, किंवा डान्स इत्यादी प्रकार आहेत. ही एक्सरसाइज फुफ्फुसांना निरोगी ठेवते.

3 बलून एक्सरसाइज –
फुगे फुगवण्याची एक्सरसाइज सुद्धा फुफ्फुसांसाठी चांगली आहे. यात वेगाने फुफ्फुसांत ऑक्सीजन पोहचतो आणि श्वास सोडताना कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. यामुळे धाप लागण्याची समस्या कमी होते.