Pimpri News : सौंदर्य स्पर्धेेचे आयोजन करणे महापौरांच्या मुलाला महागात पडले, FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या महापाैर पुत्राविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जवाहर मनोहर ढोरे (रा. नवी सांगवी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महादेव मारुती शिंदे (वय 54, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली.

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे चिंचवड येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महापाैर उषा ढोरे यांचा मुलगा जवाहर ढोरे यांनी सोमवारी (दि.22) मिस पिंपरी-चिंचवड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी ही स्पर्धा झाली. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी रॅम्प वाॅक केले. त्यावेळी महापाैर उषा ढोरे यांनी मास्कचा वापर न करता रॅम्प वाॅक केला. चित्रपट अभिनेत्री देखील या वेळी उपस्थित असल्याने प्रेक्षागृहात मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी मास्कचा वापर केला नव्हता. तसेच एकत्र येऊन गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे संबंधित अभिनेत्रीवरही कारवाई केली जाणार आहे. कारोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने प्रेक्षागृहात प्रत्येकाला नोटीस बजावण्यात येणार आहे.