दिलासादायक ! राज्यातील 15 जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत होऊ लागली घट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   संपूर्ण देशात कहर माजवलेल्या कोरोनाच्या(corona) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला कोरोना (corona )संसर्गाचे प्रमाण अधिक होते तेथे आता दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या आता उतरणीला लागली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचा समावेश आहे. दरम्यान, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जालना, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या जिल्हांमध्ये अजूनही बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही.

महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत कशी असावी परिस्थिती ? वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…

पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या ही ३ लाख १ हजार ७५२ इतकी नोंदवण्यात आली होती. तर दुसऱ्या लाटेमध्ये हीच संख्या ३ लाख १५ हजार ४२ इतकी झाली आहे. या दोन्हीमध्ये ४.४० टक्क्यांचा फरक दिसून आला आहे. पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत होती ती ३४ हजार २५९ इतकी नोंदवली गेली होती. तर दुसर्या लाटेत २६ मे रोजी रुग्णसंख्या २८ हजार ७४ इतकी नोंदवली आहे. टक्केवारीमधिल फरक पाहिल्यास १८.०५ टक्के इतका होता. ठाण्याचीही तशीच परिस्थिती आहे. पहिल्या लाटेत ३८ हजार ३८८ र दुसऱ्या लाटेत २१ हजार ९४९ इतकी रुग्ण संख्या होती. रायगडमध्ये पहिल्या लाटेमध्ये ११ हजार ५६ तर दुसऱ्या लाटेत ५,५२७ इतकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तर ५० टक्क्यांनी रुग्णसंख्येमध्ये घट दिसून आली होती.

Mumbai पश्चिम उपनगर Metro train ची सोमवारी ट्रायल, ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत हजर होण्याची शक्यता

दरम्यान, चंद्रपूर, धुळे, औरंगाबाद, लातूर, नाशिक, पुणे, जळगाव, गोंदिया, भंडारा, मुंबई, ठाणे, नागपूर नंदूरबार नांदेड येथे राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे ०.४७ टक्क्यांपेक्षा रुग्णवाढीचा दर हा कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागावरील ताण आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

Pfizer ची लस कधी मिळणार?; पुणेकराचं डायरेक्ट CEO ना पत्र, अन्..

कोरोनाबाधितांची संख्या टक्केवारी

सौम्य लक्षणे वा लक्षणविरहित रुग्ण – ६३.५ टक्के

गंभीर रुग्ण – १७.३९ टक्के

आयसीयूमधील रुग्ण – ६.१९ टक्के

व्हेंटिलेटर वर असलेले रुग्ण – २.२३

ऑक्सिजनवरील रुग्ण – ३.९६ टक्के

अतिदक्षता विभागाबाहेरील रुग्ण – ११.२० टक्के

 

BCCI ची घोषणा ! IPL 2021 च्या राहिलेल्या मॅच UAE मध्ये होणार, जाणून घ्या सविस्तर

नारायण राणेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘…अन्यथा आम्ही आंदोलन करू’