COVID-19 : फक्त 15 मिनिटात होणार ‘कोरोना’ची टेस्ट, दक्षिण कोरियाची कंपनी भारतात बनवतेय ‘किट’

चंदीगड : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या 25 हजारांच्या जवळपास गेली आहे. संपूर्ण देशात लोकांच्या तपासणीची संख्या वाढत आहे, ज्यामुळे नवीन प्रकरणे वेगाने पुढे येत आहेत. दुसरीकडे भारत हा चीन व दक्षिण कोरिया येथून कोरोना व्हारयरस तपासणी किट मागवत आहे. आता भारतात देखील अशा प्रकारची किट तयार करण्यात येत आहे. दक्षिण कोरियाच्या डायग्नेस्टिक किट तयार करणारी कंपनी एस.डी. बायोसेन्सरने हरियाणामधील गरुग्राम येथे जलद अँटीबॉडी किट तयार करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, या किटमुळे कोरोनाची तपासणी केवळ 15 मिनिटात होऊ शकेल.

मानेसर प्लांटचे प्रमुख अंशुल सारस्वत म्हणाले की, आम्हाला छत्तीसगड येथून या किटची ऑर्डर मिळाली आहे. त्यांनी सांगितले की, हरियाणा सरकारने देखील 1 लाख किटची ऑर्डर दिली आहे. यामध्ये 25 किट पाठवण्यात आले आहेत. बाकीचे किट देखील लवकरच पाठवण्यात येतील. सारस्वत यांनी सांगितले की, अजून काही उत्पादनांची आयसीएमआर कडून तपासणी केली जात आहे.

चिनी कंपन्या सहकार्यासाठी तयार
नुकतेच भारताने चीनकडून 5.5 लाक चाचणी किट विकत घेतले होते. परंतु बऱ्याच राज्यात नमुन्याची चाचणी समाधानकारक नसल्याने भारताने अँटीबॉडी रॅपिड टेस्टिंग किटचे परिक्षण दोन दिवसांत थांबवले. या प्रकरणानंतर भारतातील कोरोनाच्या त्वरित स्क्रीनिंगसाठी किटचा पुरवठा करणाऱ्या दोन चिनी कंपन्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल तक्ररी आल्यास ते चाचणीमध्ये सहकार्य़ करण्यास तयार आहेत.