खुशखबर ! आता केवळ 10 मिनिटात होईल ‘कोरोना’ व्हायरसची टेस्ट

नवी दिल्ली : कोविड-19 महामारीमुळे भारतासह जगभरातील लोक चिंतेत आहेत. या जागतिक महामारीच्या व्हायरसची टेस्ट केल्यानंतर सुमारे दोन दिवसानंतर टेस्टचा रिपोर्ट येतो, तर मुळ भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञाने एक अशी टेस्ट विकसित केली आहे, ज्याद्वारे दहा मिनिटात रूग्णाला संसर्ग झाला आहे किंवा नाही हे समजू शकते.

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी जी टेस्ट विकसित केली आहे, त्यामध्ये कोविड-19 ने रूग्ण संक्रमित असल्यास रंग बदलतो. यामध्ये रंग बदलण्यासाठी प्लास्मोनिक गोल्ड नॅनोपार्टिकल्स युक्त एका सोप्या चाचणीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, ही टेस्ट करण्यासाठी कोणत्याही हाय क्वालिटी लॅबची गरज नाही. जसे की डीएनएसाठी तपासणी केली जाते.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, प्राथमिक परिणामांच्या आधारावर आपण पहिल्याच दिवशी जाणून घेऊ शकतो. मात्र, याचा अभ्यास करणार्‍या रेडियोलॉजी, अणू चिकित्सा आणि बाल रोगाचे प्रोफेसर दीपांजन पान म्हणतात, संक्रमित व्यक्ती प्रत्यक्षात कोविड-19 ने संक्रमित असेल तर तिच्यासाठी अतिरिक्त अभ्यास करण्याची गरज आहे. आमचे तज्ज्ञ एकदाच रूग्णाच्या नाकातून स्वॅब किंवा लाळेतून सॅम्पल घेतात, ज्यासाठी सुमारे दहा मिनिटे वेळ लागतो.

ही टेस्ट प्रोटीनची माहिती घेण्यासाठी केली जाते की, सोन्याच्या कणांशी संबंधीत विशिष्ट अणु त्यामध्ये आहे किंवा नाही. हे प्रोटीन आनुवंशिक अनुक्रमाचा भाग आहे, जे केवळ कोविड-19 मध्येच मिळते. डॉ. पान यांच्यानुसार बायोसेंसर जेव्हा व्हायरसचा जीन अनुक्रम तयार करतो, तेव्हा सोन्याचे नॅनोकण जांभळ्या रंगातून निळ्या रंगात प्रतिक्रिया देतात. हे कोणत्याही व्यतीमध्ये व्हायरसचा शोध घेण्यासाठी सक्षम आहे. जर खरोखरच व्यक्तीमध्ये व्हायरस असेल तर संसर्ग असल्याचे ही टेस्ट सांगते.

प्रोफेसर दीपांजन पान यांनी इमर्जन्सीमध्ये ही टेस्ट करण्यासाठी अधिकार आणि आवश्यकतेवर चर्चा करण्यासाठी पुढील महिन्यात अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनासोबत (एफडीए) बैठक करण्याची योजना तयार केली आहे. सहायक शास्त्रज्ञ मॅथ्यू फ्रीमॅन यांनी म्हटले की, ही टेस्ट आरएनए-आधारित व्हायरसचा शोध घेण्यासाठी खुपच चांगली आहे. या टेस्टचा अभ्यास करणार्‍या टीमध्ये डॉ. पान यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांचा सहभाग आहे.