कर्नाटकात प्रवेशासाठी लागणार कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र

निपाणी : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कोगनोळी येथे महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराजय सीमा असणार्‍या टोलनाक्यावर तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली आहे. कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रत्येक व्यक्तीकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात आले आहे.

कोगनोळी टोलनाक्यावर कोविड तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली आहे. येथे कर्नाटकात जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करुन व कोविड प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. कर्नाटकात येणार्‍या व्यक्तीकडे मागील ४८ ते ७२ तासांमध्ये कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. प्रमाणपत्र नसणार्‍या व्यक्तींना कर्नाटकात प्रवेश देण्यात येणार नाही. मोटारसायकलपासून बसपर्यंत सर्वच वाहनांतील लोकांचे थर्मल स्कॅनिंग करुनच त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. जर काही कोविड सदृश्य लक्षणे आढळली तर त्यांना परत पाठविण्यात येणार आहे, असे निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.