Coronavirus : मोदी सरकारचं मोठं पाऊल ! आता 50 कोटी लोकांची ‘फ्री’मध्ये होईल ‘कोरोना’ टेस्ट अन् उपचार देखील

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देश कोरोना विरोधात लढत आहे यावर बोलताना केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की कोरोना व्हायरस प्रादुर्भावाची चाचणी आणि उपचार आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेतंर्गत करण्यात येणार आहे. असे असले तरी सरकारी रुग्णालयात कोरोनाची चाचणी आणि उपचार मोफत होत आहेत. आता सरकारच्या या योजनेतंर्गत 50 कोटी पेक्षा जास्त लोक खासगी लॅबमध्ये कोविड -19 ची मोफत चाचणी करुन घेऊ शकतात. या योजनेतंर्गत रुग्णालयात येणाऱ्यांची कोविड – 19 ची चाचयमी आणि उपचार एकदम मोफत केली जाईल.

खासगी लॅबला पाळावे लागणार ICMR प्रोटोकॉल –
AB_PM JAY योजनेतंर्गत निवड केलेली रुग्णालये आपल्या स्तरावर टेस्टिंगची सुविधा देऊ शकतात. त्यांचाकडे अधिकृत टेस्टिंग फॅसिलिटीची मदत घेण्याचा पर्याय देखील असेल. ही टेस्टिंग इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) अंतर्गत होईल. या सर्व अधिकत खासगी प्रयोगशाळांना
(लॅब) ICMR चे प्रोटोकॉल पाळणे अनिवार्य आहे. याच प्रकारे खासगी रुग्णालयातील कोविड – 19 चा उपचार AB-PM JAY योजने अंतर्गत येतील.

केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, या अभूतपूर्व संकटाच्या स्थितीत आपल्याला तत्परतेने खासगी क्षेत्रातील प्रमुख स्टेकहोल्डर्सला लढण्यासाठी सोबत घेतले पाहिजे. आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत आपण चाचण्या आणि उपचाराच्या चांगल्या स्तरावर पोहोचतील. यात खासगी क्षेत्रातील रुग्णालयांची देखील महत्वाची भूमिका असेल.

चाचण्या आणि उपचाराच्या सुविधांचा पुरवठा वाढेल –
सरकारने हा निर्णय यासाठी घेतला आहे की जेणेकरुन चाचण्या आणि उपचारांचा पुरवठा वाढेल. या योजनेंतर्गत खासगी रुग्णालये आणि खासगी प्रयोगशाळेत देखील ICMR च्या गाइडलाइननुसार चाचणी केली जाऊ शकते.

कोणत्या खासगी प्रयोगशाळेत केली जाऊ शकते चाचणी –
ही चाचणी त्या प्रयोगशाळेत केली जाईल, ज्यांच्याकडे RNA व्हायरसच्या PCR तपासासाठी NABL ची मान्यता आहे आणि जेव्हा एखाद्या क्वालिफाइड डॉक्टरांनी टेस्टिंगचा सल्ला दिला असेल.

खासगी रुग्णालयाचे कोरोना विशेषकृत रुग्णालयात रुपांतर –
सरकारच्या या निर्णयाने अधिक संख्येने खासगी कंपन्या कोरोनाच्या चाचणीसाठी आणि उपचारांसाठी पुढे येऊ शकतील. सध्या, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अशात खासगी क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरेल. यासाठी राज्य सरकार खासगी रुग्णालयांची यादी तयार करण्यात येत आहे, जी रुग्णालये कोविड – 19 स्पेशल रुग्णालात बदलण्यात येऊ शकतात.