Covid-19 : लक्षणे नसलेल्या गरोदर महिलांसाठी ‘टेस्टींग’ महत्वपूर्ण, कमजोर ‘इम्यून’ असल्यास जास्त धोका

न्यूयार्क : वृत्तसंस्था – इम्यून सिस्टम कमजोर असल्यानंतर हल्ला करणार्‍या कोरोना व्हायरसचा धोका सर्वात आधी ज्येष्ठ, लहान मुलांसह गरोदर महिलांना सुद्धा आहे. एका अभ्यासात खुलासा झाला आहे की, लक्षणे नसलेल्या (असिम्प्टोमॅटीक) गरोदर महिलांसाठी कोविड-19 टेस्टींग महत्वपूर्ण आहे.

6 महिन्यांपासून जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरू आहे. यादरम्यान, गरोदर महिला आणि गर्भातील बाळावर संशोधन सुरू आहे. या संशाधनानंतर आलेल्या परिणामानुसार, गरोदर महिलांना संसर्ग होण्याची शक्यता इतर महिलांच्या तुलनेत जास्त आहे. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती हार्मोनल बदलांमुळे कमजोरी होते. काही शोधांनुसार गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला तरी गर्भातील बाळाला संसर्ग होत नाही. गरोदर महिलेला संसर्ग झाल्यास गर्भातील बाळाचे वजन कमी होऊ शकते, वेळेपूर्वी प्रसुती होऊ शकते, तसेच गर्भातील बाळामध्ये अन्य काही समस्याही निर्माण होऊ शकतात.

18 दिवसात मास जनरल ब्रिघम हेल्थशी संबंधीत चार मोठ्या हॉस्पिटल्समध्ये युनिव्हर्सल टेस्टींग झाले, ज्यामध्ये 757 महिलांची तपासणी करण्यात आली. यापैकी 139 मध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळून आली. लक्षणे असणार्‍या महिलांमध्ये 7.9 टक्के महिला संक्रमित आढळल्या. त्यांच्यामध्ये सार्स-कोव्ह-2 हा व्हायरस आढळून आला ज्याच्यामुळे कोविड-19 आजार होतो. पॉझिटीव्ह असिम्प्टोमॅटीक महिलांमध्ये हॉस्पिटीलमध्ये दाखल असताना सुद्धा कोविड-19 ची लक्षणे दिसून आली नाहीत. या सर्व महिलांनी ज्या मुलांना जन्म दिला त्या सर्व मुलांच्या टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत.