COVID-19 च्या भारतात आतापर्यंत एक कोटी टेस्ट, 1105 चाचणी प्रयोगशाळा करतायेत काम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोविड – 19 चा तपास करण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या संख्येने सोमवारी भारतात 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, सोमवारी भारतात 24,248 नवीन कोरोना विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली असून त्यानंतर संक्रमित रूग्णांची संख्या 7 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्याही वाढून 19,693 झाली आहे. गेल्या 24 तासांत या आजारामुळे 425 लोकांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) वैज्ञानिक आणि माध्यम समन्वयक डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले की, 5 जुलै रोजी 1,80,596 चाचण्या घेण्यात आल्या असून सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत देशात एकूण 1,00,04,101 नमुने घेण्यात आले आहेत. तसेच सध्या देशात 1105 चाचणी प्रयोगशाळा आहेत, त्यापैकी 788 सरकारी आणि 317 खाजगी आहेत. शर्मा म्हणाले की, दैनंदिन चाचणीची क्षमताही वेगाने वाढली आहे. गेल्या 14 दिवसांपासून दररोज 2,00,000 नमुन्यांची चाचणी घेण्यात येत आहे.

1 जुलै रोजी भारतात कोविड -19 चाचणीची संख्येने 90 लाखांचा टप्पा ओलांडला. शर्मा म्हणाले की, 25 मे पर्यंत दररोज 1.5 लाख चाचण्या घेण्यात येत होत्या, ज्याची संख्या आता वाढून 3 लाख झाली आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) ने सुरू केल्यानंतर लॉकडाऊन सुरू होईपर्यंत 100 लॅबची स्थापना केली होती. आयसीएमआरने 23 जून रोजी 1000 व्या चाचणी प्रयोगशाळेस मान्यता दिली. आरोग्यमंत्री आधीच म्हणाले आहेत की, कोविड – 19 ची तपासणी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीही अनेक पावले उचलली आहेत. केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचणी सुविधा वाढविण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.