COVID-19 third wave : एक्सपर्ट्सचा दावा ! मुलांसाठी धोकादायक होऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, जाणून घ्या 10 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट सुरू असून आता दररोज नवीन रूग्णांची संख्या 4 लाखांच्या पुढे गेली आहे. तर रोज मरणार्‍यांची संख्या 4 हजारांच्या जवळ पोहचली आहे. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सीजन, औषधांच्या सुविधा मिळत नसल्याने रूग्णांना जीव गमवावा लागत आहे. या दरम्यान, तज्ज्ञांनी देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तिसरी लाट जास्त धोकादायक असू शकते, विशेषकरून मुलांसाठी.

– शास्त्रज्ञ तसेच औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक शेखर सी. मांडे यांनी सावध केले की, कोविड-19 संकट अजूनही संपलेले नाही आणि जर महामारीची तिसरी लाट आली तर तिचे गंभीर परिणाम होतील.

– केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन म्हणाले, व्हायरसचा उच्च स्तराचा प्रसार पाहता तिसरी लाट येणे अनिवार्य आहे परंतु हे स्पष्ट नाही की, ही तिसरी लाट कधी येईल आणि कोणत्या स्तराची असेल.

– उच्च न्यायालयाने म्हटले की, देशाला कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेसाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या पीठाने म्हटले, आपल्या कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेसाठी तयार राहणे आवश्यक आहे.

– न्यायालयाने म्हटले की, मोठ्यांपेक्षा मुलांमध्ये या आजारातून बरे होण्याची क्षमता जास्त आहे, परंतु आपल्या हा सुद्धा विचार करावा लागेल की, ते स्वत: हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीत आणि जर त्यांचे आई-वडील त्यांना घेऊन गेले तर त्यांच्यासाठी जोखीम निर्माण होईल.

– न्यायालयाने म्हटले की, एक केंद्रीकृत ’बफर स्टॉक’ असावा म्हणजे एखाद्या हॉस्पिटलला ऑक्सीजनची कमतरता असेल तर तात्काळ पुरवठ्यासाठी संपर्क करता येईल, ज्यामुळे हजारो लोकांचा जीव वाचवता येईल अणि भीतीची स्थिती टाळता येईल.

– केंद्र सरकारने म्हटले कोरोना व्हायरसची तिसरी लाट अपरिहार्य आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी म्हटले की, देश ज्या मोठ्या कोविड लाटेचा सामना करत आहे, तिचा पूर्वअंदाज व्यक्त करता होऊ शकत नाही.

– नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, बदलणार्‍या व्हायरसची प्रतिक्रिया समान असते. आपल्याला कोविड-उपयुक्त वर्तणूक अवलंबण्याची आवश्यकता आहे, जसे की मास्क घालणे, अंतर राखणे, स्वच्छता, अनावश्यक भेट टाळणे आणि घरातच राहणे.

– सीएसआयआरने सुद्धा म्हटले की, भारत अजून सामुदायिक प्रतिकारशक्ती मिळवण्यापासून दूर आहे आणि अशावेळी लोकांना व्हायरसच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. याशिवाय सामाजिक अंतर, हाताची स्वच्छता इत्यादी उपायांचे पालन करत राहावे.

– महाराष्ट्रात लसीकरणाच्या मंद गतीमुळे संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. हा इशारा तेव्हा जारी केला गेला आहे जेव्हा महाराष्ट्र सरकारने म्हटले की, योग्य प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र सरकार 18 ते 44 वर्षाच्या लोकांचे लसीकरण एक मेपासून सुरू करू शकत नाही.

– शास्त्रज्ञ आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) चे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले, कोविड-19 महामारीची तिसरी लाट नाकारली जाऊ शकत नाही आणि लोकांना ठरवावे लागेल की, असे होऊ नये. लोकांना शिस्त आणि स्व-नियंत्रणाचे पालन करावे लागेल आणि आजाराला पराभावाचा मार्ग दाखवावा लागेल.