Coronavirus : धक्कादायक अहवाल समोर ! लाखो मुलांवर ‘विनाशकारी’ परिणाम करेल COVID-19

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस आणि त्याचे परिणाम यावर बरेच अभ्यास केले जात आहेत आणि दररोज काहीतरी नवीन माहिती मिळत आहे. पण कोविड-१९ चा मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांशी संबंधित एक अहवाल धक्कादायक आहे.

एका समुहाचे म्हणणे आहे की, या आपत्तीमुळे लाखो मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. कारण कोरोना विषाणू महामारी त्यांना जबरदस्तीने श्रम करायला आणि कमी वयात लग्न करण्यास भाग पाडेल. कारण जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, लवकर बंदी उठवल्यामुळे प्रकरणे पुन्हा एकदा उच्च स्तरावर जातील.

डच एनजीओ किड्स राइट्सच्या म्हणण्यानुसार- ‘मुलांच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांना आणि प्रगतीला हे संकट बरीच वर्षे मागे घेऊन जाईल. म्हणून मुलांच्या अधिकाराकडे पूर्वीपेक्षा अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.’

एनजीओचे संस्थापक मार्क डुलार्ट यांनी आपले वार्षिक सर्वेक्षण सादर करताना म्हटले आहे – ‘ही महामारी ज्यामुळे आज सरकारकडे आरोग्य आणि शिक्षणासाठी पैसा नाही, उद्या लाखो मुलांना गरीबीमध्ये ढकलेल.’

किडस राइट्सच्या वार्षिक रँकिंगने संयुक्त राष्ट्रांच्या डेटाचा वापर हे मोजण्यासाठी केला की, बाल हक्कांवर देश कोणत्या प्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाच्या पातळीवर मोजला जातो.

मुलांची लसीकरण मोहिम रद्द झाल्यामुळे बालमृत्यू दर वाढण्याची शक्यता वाढली आहे. तर सहसा शालेय जेवणावर अवलंबून असणाऱ्या लाखो मुलांकडे रोजचा पोषण आहार मिळण्याचा कोणताही स्रोत नसतो.

महामारीमुळे यावर्षीच्या सर्वेक्षणात आइसलँड, स्वित्झर्लंड आणि फिनलँडला अव्वल स्थानावर ठेवले आहे, तर चाड, अफगाणिस्तान आणि सिएरा लिऑन यांना सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये स्थान दिले आहे.

एनजीओचा इशारा तेव्हा आला जेव्हा डब्ल्यूएचओचे आपत्कालीन प्रमुख माईक रयान हे कोणत्याही वेळी होणाऱ्या संसर्गाच्या दुसर्‍या लाटेविषयी बोलले. विशेषत: जर पहिली लाट थांबवण्याच्या उपाययोजना किंवा निर्बंध लवकर हटवले गेले तर.