COVID-19 | इंग्लड दौर्‍यातील दोन क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; एक खेळाडू अजूनही विलगीकरणात

लंडन : वृत्त संस्था – COVID-19 | इंग्लड विरुद्ध कसोटी मालिका (Test series against England) सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे (team india) दोन खेळाडु कोरोना बाधित (corona interrupted) झाले असून त्यापैकी एक खेळाडु हा अजूनही विलगीकरणात राहत असल्याचे समोर आले आहे. जागतिक कसोटी सामन्यामध्ये न्युझिलंडने भारतावर मात करीत जागतिक कसोटी विजेतेपद पटकाविले. या सामन्यानंतर टीम इंडियाने ब्रेक घेतला आहे. खेळाडु इंग्लंडमध्येच असून काही खेळाडु वेगवेगळ्या क्लबकडून खेळत आहेत.

काही जण सुट्टी एन्जॉय करत आहेत. अशात दोन खेळाडुंना कोरोनाची लागण झाल्याचे नियमित तपासणीत उघड झाले. दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र, बीसीसीआयने (BCCI) ही बाब उघड होऊ दिली नव्हती. दोघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यापैकी आता एकाची टेस्ट निगेटिव्ह (Negative) आली आहे. दुसर्‍या खेळाडुची टेस्ट १८ जुलै रोजी करण्यात येणार आहे.

त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो संघाबरोबर सरावात कधी सहभागी होणार हे निश्चित करण्यात येणार आहे.
इंग्लंडबरोबरील कसोटी मालिकेला (Test series) ऑगस्टमध्ये सुरुवात होत असली तरी त्याअगोदर २० जुलैपासून सराव सामने सुरु होत आहेत.

Web Title : COVID-19: Two Indian cricketers tested positive in UK, one still in isolation but asymptomatic

हे देखील वाचा

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी गर्दी करणार्‍यांवर आयोजकांसह
43 नेते आणि 120 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pregnancy Bible | करीना कपूर-खान विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

Piyush Goyal | रेलवेमंत्री पदावरून पायउतार झालेल्या पियूष गोयल
यांच्यावर भाजपानं सोपवली मोठी जबाबदारी, दिलं प्रमोशन