Covid-19 Vaccination : उद्यापासून दिली जाणार ‘कोरोना’ची व्हॅक्सीन, सरकारने जारी केली गाइडलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  प्रतिक्षा आता संपणार आहे. देशभरात उद्या म्हणजे शनिवारी कोरोना व्हायरसची लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियानाची सुरुवात करतील. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये लस दिली जाईल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ची कोविशील्ड व्हॅक्सीन (Covishield) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन (Covaxin) ला भारतात इमर्जन्सी वापरासाठी मंजूरी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियानाची सुरुवात करतील. हे जगातील सर्वात मोठे लसीकरण असेल. या कार्यक्रमाद्वारे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 3006 ठिकाणे डिजिटल माध्यमातून जोडली जातील आणि प्रत्येक केंद्रावर 100 लोकांचे लसीकरण होईल. व्हॅक्सीनबाबत सरकारने गाइडलाईन्स जारी केली आहे.

1. कोविशील्ड व्हॅक्सीन आणि कोव्हॅक्सीनची किंमत भारतात 200-295 रुपये असेल. सरकारने आतापर्यंत 1.65 कोटी रुपयांची व्हॅक्सीन सर्व राज्यांना पाठवली आहे. पहिल्या फेजमध्ये हेल्थ वर्कर्सला व्हॅक्सीनचा डोस दिला जाईल.

2. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून सांगितले आहे की, व्हॅक्सीनचा डोस केवळ 18 वर्षावरील वयाच्या लोकांना दिला जावा. याशिवाय हे सुद्धा सांगण्यात आले आहे की, व्हॅक्सीन बदलली जाणार नाही. म्हणजे दोन्ही डोस एकाच कंपनीचे असतील.

3. आरोग्य मंत्रालयाने दोन्ही लसींच्या लसीकरणानंतर हलक्या साइड इफेक्टबाबत सुद्धा सांगितले आहे. कोविशिल्डच्या डोसच्या इंजेक्शनच्या ठिकाणी थोडी वेदना होऊ शकते. डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो.

4. कोव्हॅक्सीनच्या डोसनंतर डोकेदुखी, हलका ताप, थकवा, पोटात किंचित दुखणे, उलटी या तक्रारी होऊ शकतात.

5. प्रेग्नंट महिला आणि मुलांना व्हॅक्सीन दिली जाणार नाही. व्हॅक्सीनच्या कोणत्याही फेजमध्ये अशा महिलांवर, मुलांवर ट्रायल करण्यात आलेली नाही.

6. लसीकरण अभियान जनसहभागाच्या सिद्धांतावर आधारीत चालवले जाईल, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यांतर्गत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी आणि आयसीडीएस कर्मचार्‍यांचे लसीकरण केले जाईल.

7. सरकारकडून कोविड-19 महामारी, लसीकरण आणि याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मशी संबंधित प्रश्नांसाठी 24 तास आणि 7 दिवस चालणारे कॉल सेंटर आणि हेल्पलाइन 1075 स्थापन करण्यात आली आहे.