Covid 19 Vaccination : 10 पॉईंटमध्ये जाणून घ्या कसे होणार लसीकरण; SMS, आधार आणि DG लॉकरद्वारे पटणार ओळख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हॅक्सीनचे लसीकरण 12 ते 14 दिवसात सुरू होणार आहे. यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली आहे. या अंतर्गत लसीकरणासाठी कोविन अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. कोरोना व्हॅक्सीन घेण्यासाठी याद्वारे 12 भाषांमध्ये एसएमएस आणि आधार कार्डच्या प्रमाणीकरणाद्वारे लसीकरणाचे पुष्टीकरण होईल. महामारी दरम्यान मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियानाचे व्यवस्थापन करणे आणि स्केल करण्यासाठी छोट्या प्रमाणात कोविड व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क विकसित करण्यासाठी कोविन अ‍ॅपचा वापर होईल. आणि याच्या इकोसिस्टमचा वापर केला जाईल.

भारताने आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मंजूरी दिली आहे. यामध्ये सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन यांचा समावेश आहे. सरकारने डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैन्य कर्मचारी व अन्य लोकांना लसीकरणात प्राधान्य दिले आहे. देशात लसीकरण अभियान कशाप्रकारे राबवले जाणार आहे ते 10 पॉईंटमध्ये जाणून घेवूयात…

1. आरोग्य मंत्रालयानुसार, कोविन इकोसिस्टमच्या माध्यमातून लसीकरण सत्राचे स्वयंचलित वाटप होईल. नोंदणीकरण प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी आधारचा वापर केला जाईल.

2. व्हॅक्सीन हवी असणार्‍यांसाठी एक विशिष्ट आरोग्य ओळख बनवण्याची योजना आहे. व्हॅक्सीन दिल्यानंतर संभाव्य प्रतिकुल प्रभावाचे जवळून रिपोटिर्ंंग आणि ट्रॅकिंग होईल.

3. लसीकरण मार्गदर्शनासाठी सामान्य लोकांना 12 भाषांमध्ये एसएमएस पाठवले जातील. ज्याद्वारे आरोग्य कार्यकर्ते लस देऊ शकतील. सर्व डोस दिल्यानंतर एक क्यूआर कोड आधारित लसीकरण प्रमाणपत्र जारी केले जाईल. ते मोबाइलमध्ये ठेवता येईल.

4. सरकारचे कागदपत्र संग्रह अ‍ॅप डीजीलॉकरमध्ये क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र संग्रहीत करणे आणि आणण्यासाठी वापरता येईल. यासाठी एक 24 तास हेल्पलाइन असेल.

5. कोविन अ‍ॅपमध्ये 75 लाख आरोग्य अधिकार्‍यांचा डेटा आहे, ज्यांना प्रथम लसीकरण केले जाईल. अ‍ॅपचे चार मॉड्यूल असतील – यूजर व्यवस्थापन मॉड्यूल, लाभार्थी नोंदणी, लसीकरण आणि लाभार्थी स्वीकृती आणि सध्याची स्थिती.

6. कोविन अ‍ॅप लसीकरण नोंदणीसाठी तीन पर्याय देईल – स्व नोंदणी, व्यक्तिगत नोंदणी (एक अधिकारी डेटा अपलोड करून मदत करेल) आणि बल्क अपलोड, मात्र या प्रक्रियेची सविस्तर घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. ही शक्यता आहे की, सरकार शिबिरे लावून तिथे अधिकारी व्हॅक्सीनसाठी नोंदणी करतील.

7. दिल्लीत कोविड टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. सुनीला गर्ग यांनी म्हटले की, 50 वर्षापेक्षा वरील लोकांच्या डेटासाठी मतदार यादीची मदत घेतली जाईल. तो डेटा कोविनमध्ये फीड केला जाईल. यानंतर तो जनतेसाठी खुला केला जाईल. जर एखाद्या व्यक्तीचा पत्ता किंवा नाव नसेल तर तो जिल्हा किंवा तालुका अधिकार्‍यांशी संपर्क साधू शकतो आणि आपले नाव नोंदवू शकतो. 50 वयाच्या खालील लोक ज्यांना हृदयरोग किंवा कॅन्सर आहे, ते आपले वैद्यकीय प्रमाणपत्र सिस्टममध्ये अपलोड करू शकतात.

8. सरकारने म्हटले की, लसीकरणाच्या विविध टप्प्यांच्या डेव्हलपमेंटसाठी क्षेत्रात सॉफ्टवेयरची टेस्ट करण्यासाठी ड्राय रन घेतली जात आहे. देशातील 700 जिल्ह्यांमध्ये 90,000 पेक्षा जास्त लोकांना सॉफ्टवेयरचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.

9. आरोग्य सेवा आणि इतर मेडिकल फ्रंटलाइन कर्मचार्‍यांचा डेटा प्लॅटफार्मवर अपलोड करण्यात आला आहे. त्यांना नोंदणीची आवश्यकता नाही.

10. लसीकरणासाठी लोकसंख्येत प्राथमिकता असलेल्या गटांसाठी स्वयंचलित सिस्टम वाटपासाठी स्लॉट केले जाईल. जिल्हा मॅजिस्ट्रेट त्या तारखा ठरवू शकतात, ज्यावर लसीकरण सत्र आयोजित करता येऊ शकते.