केवळ 6 दिवसात 10 लाख लोकांना दिला ‘कोरोना’चा डोस, अमेरिका आणि ब्रिटनला सुद्धा भारताने टाकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, देशात केवळ सहा दिवसात 10 लाख लोकांना कोविड-19 चा डोस देण्यात आला आहे. हा एक असा आकडा आहे, ज्याने अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांना मागे टाकले आहे. मंत्रालयानुसार देशात लसीकरण अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 16 लाख लोकांना डोस दिला गेला आहे. मंत्रालयाने सांगितले की, 10 लाखांचा आकडा पार करण्यासाठी ब्रिटनला 18 दिवस आणि अमेरिकेला 10 दिवसांचा वेळ लागला होता.

मंत्रालयाने सांगितले की, 24 जानेवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे 16 लाख (15,82,201) लाभार्थ्यांना लस दिली होती. मागील 24 तासात देशभरात 3,512 सत्रांमध्ये सुमारे दोन लाख (1,91,609) लोकांना लस दिली. तर आतापर्यंत लसीकरणासाठी 27,920 सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

रूग्णांची संख्या होत आहे कमी
मंत्रालयाने सांगितले की, देशात ‘तपास-संपर्काचा पत्ता-उपचाराची रणनिती’ यशस्वी होत आहे आणि देशात नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होण्यासह संसर्गावर उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत सुद्धा उल्लेखनीय घट झाली आहे. देशात आता 1,84,408 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, जे एकुण प्रकरणांच्या 1.73 टक्के आहे. मागील 24 तासात 15,948 रूग्ण संसर्गातून मुक्त झाले, ज्यानंतर उपचार सुरू असलेल्या रूग्णांच्या संख्येत या काळात थेट प्रकारे 1,254 रूग्णांची घट झाली.

लागोपाठ बरे होत आहेत लोक
देशात संसर्गाचा उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी 75 टक्के केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील आहेत. केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त 5,283 रूग्ण बरे झाले. यानंतर महाराष्ट्रात 3,694 रूग्ण बरे झाले. मंत्रालयाने सांगितले की, देशात आतापर्यंत 1,03,16,786 रूग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत. नवीन बरे झालेल्या लोकांपैकी 84.30 टक्के 10 राज्य आणि केंद्रशासित राज्यातील आहेत.

80.67 टक्के प्रकरणे 6 राज्यांतून
केरळात एका दिवसात सर्वात जास्त 6960 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर महाराष्ट्रात 2697 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. देशात मागील 24 तासात कोविड-19 ची 14,849 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या वाढून 1,06,54,533 झाली आहे. यापैकी 80.67 टक्के प्रकरणे सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून समोर आली आहेत.