Covid व्हॅक्सीन सेंटर आणि लसीच्या सध्याच्या ‘स्लॉट’बाबत कशी घ्याल माहिती? ‘या’ 5 ऑनलाईन ठिकाणांवरून मिळेल अचूक माहिती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार उडालेला असताना लोकसंख्येच्या हिशोबाने तेवढ्या प्रमाणात व्हॅक्सीन मिळत नसल्याने सुद्धा मोठी समस्या निर्माण झाली आहे. व्हॅक्सीन कुठे आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे हे लोकांना जाणून घेण्यात अडचणी येत आहेत. अशावेळी स्वतंत्र संशोधक आणि तंत्रज्ञान असलेल्या संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या क्षेत्रात कोविड व्हॅक्सीनची उपलब्धता जाणून घेवू शकता. पण व्हक्सीनच्या बुकिंगसाठी तुम्हाला कोविन पोर्टलवरच जावे लागेल. अशा काही प्लॅटफॉर्म बाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही व्हॅक्सीनची उपलब्धता जाणून घेवू शकता.

कोविड-19 व्हॅक्सीन फायंडर :
हे पेटीएमने लाँच केले आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या क्षेत्रातील व्हॅक्सीनची उपलब्धता जाणून घेवू शकता. यासाठी पेटीएम अ‍ॅपवर उघडा, यात खाली मिनी अ‍ॅप स्टोअर सेक्शन दिसेल. येथे जा आणि व्हॅक्सीन फायंडर ऑपशनवर क्लिक करा. सर्व डिटेल्स भरा. जर व्हॅक्सीन उपलब्ध नसेल तर ’नोटिफाय मी व्हेन स्लॉट्स अव्हेलेबल’च्या ऑपशनवर क्लिक करा.

व्हॅक्सीनेट मी :
हे फिटनेस अ‍ॅप ’हेल्दीफाईमी’ने जारी केले आहे. यात पिन कोड आणि जिल्ह्याचे नाव टाकून स्लॉटची माहिती मिळवू शकता. ’नोटिफाय मी व्हेन स्लॉट्स अव्हेलेबल’ ऑपशन निवडू शकता.

गेटजॅब डॉट इन :
हा सुद्धा खास प्लॅटफॉर्म असून येथे व्हॅक्सीनच्या उपलब्धतेची सर्व माहिती मिळेल. या प्लॅटफॉर्मची सुरुवात आयएसबीच्या अल्यूमिनी श्याम सुंदर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे. यात मागितलेली माहिती भरा.

कोविन :
हे सर्वात प्रचलित आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्ही सहज व्हॅक्सीनच्या उपलब्धतेची माहिती तसेच व्हॅक्सीन स्लॉट बुक करू शकता.

मायगोव्ह कोरोना हेल्प डेस्क :
व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्ही व्हॅक्सीन उपलब्धतेची माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्हाला MyGov Corona Helpdesk च्या चॅटबोटमध्ये जावे लागेल. हे मागच्या वर्षी मार्चमध्ये लाँच केले होते. येथून माहिती मिळवण्यासाठी 9013151515 नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करा. यानंतर तुम्ही या नंबरवर हॅलो लिहून पाठवा आणि नंतर सहजपणे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा. हे हिंदीत सुद्धा वापरू शकता.