Covid-19 Vaccine : 30 कोटी लोकांना मोफत देणार ‘कोरोना’ व्हॅक्सीन, ‘या’ अटी पूर्ण न केल्यास द्यावे लागतील पैसे

नवी दिल्ली : सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकची व्हॅक्सीन तिसर्‍या फेजच्या अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये पोहचण्यासोबतच सरकारची व्हॅक्सीन वितरणाची रणनिती स्पष्ट होऊ लागली आहे. या नणनिती अंतर्गत कोरोनाची तपासणी आणि रूग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच अन्य कोरोना वॉरियर्ससह 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना केंद्र सरकार प्राथमिकतेच्या आधारावर मोफत व्हॅक्सीन देईल. याशिवाय अन्य लोकांना व्हॅक्सीनसाठी मोठी प्रतिक्षा करावी लागेल आणि पैसेही मोजावे लागू शकतात.

यांच्यासाठीच लागतील 6 ते 7 महिने
राज्य सरकारांना सुद्धा आपले प्राथमिकता असलेले गट ठरवून त्यांना व्हॅक्सीन देण्याची सूट असेल. केंद्र सरकार घाऊक व्हॅक्सीन खरेदी करून राज्यांना उपलब्ध करून देईल. सर्वसामान्य लोकांना मोफत कोरोना व्हॅक्सीन उपलब्ध करून देण्याबाबत सरकारचा एकही अधिकारी स्पष्ट बोलण्यास तयार नाही. परंतु, मंगळवारी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट संकेत दिले की, केंद्र सरकार सर्व लोकांना मोफत व्हॅक्सीन देणार नाही. त्यांच्या अनुसार, केंद्र सरकारने कधीही सर्व लोकांना मोफत व्हॅक्सीन देण्याबात म्हटलेले नाही. तर, आयसीएमआरचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव यांच्यानुसार, सरकारचा प्रयत्न व्हॅक्सीन देऊन कोरोनाची साखळी तोडण्याचा आहे आणि व्हॅक्सीन सह मास्कची सुद्धा यात महत्वाची भूमिका आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, केंद्र सरकार 30 कोटी लोकांना प्राथमिकतेच्या आधारावर व्हॅक्सीन देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचा समावेश आहे, ज्यामध्ये कोरोनामुळे मरणारांची संख्या सर्वात जास्त आहे. प्रति व्यक्ती दोन डोसच्या हिशेबाने प्राथमिकता असलेल्या लोकांसाठी एकुण 60 कोटी डोसची आवश्यकता असेल. त्यांच्यानुसार जगातील सर्वात मोठा व्हॅक्सीन उत्पादक देश असूनही सध्याच्या क्षमतेनुसार 60 कोटी डोस मिळण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागेल. सरकारने ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत सर्व प्राथमिकता गटांसाठी व्हॅक्सीन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. म्हणजे सर्वसामान्यांना व्हॅक्सीनसाठी मोठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.