Coronavirus : अमेरिकेच्या फार्मासिटीकल कंपनीचा दावा – लवकरच ‘कोरोना’ बरं करणारी लस येणार पण…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात उच्छाद मांडवलेल्या कोरोना विषाणूची लस लवकरच येण्याची शक्यता आहे. अमेरिकेची फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्ना गेल्या काही दिवसांपासून कोविड -१९ लसीच्या चाचणीवर कार्यरत आहे. या कंपनीने सोमवारी जाहीर केले की, लवकरच ही लस मर्यादित प्रमाणात तयार करण्यात यशस्वी होईल. सोमवारी कंपनीने याबाबतचा डिस्क्लोजर रिपोर्ट यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला सादर केला.

या अहवालात मॉर्डनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेंसेल यांच्या विधानाचा हवाला देण्यात आला, जो त्यांनी गोल्डमॅन सॅक्सच्या प्रतिनिधीला दिला. या निवेदनात, बेंसेल म्हणाले, “व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध लस १२-१८ महिन्यांपर्यंत उपलब्ध होणार नाही. परंतु ही लस तातडीच्या वापरासाठी काही लोकांना उपलब्ध असू शकते, ज्यात आरोग्यसेवांमध्ये कार्यरत असलेल्यांचा समावेश असू शकतो. आणि हे केवळ २०२० च्या नंतर शक्य होईल. कंपनी अँटी कोविड १९ mRNA-१२७३ नावाने विकसित करणार आहे. अमेरिका येथील व्हॅक्सीन्स रिसर्च सेंटर (व्हीआरसी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अ‍ॅन्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीज (एनआयएआयडी) च्या संशोधकांच्या रिसर्चवर आधारित ई लस आहे.

लसीची फेज १ च्या अभ्यासावर केलेल्या कामात १६ मार्च २०२० रोजी पहिल्यांदा हा डोस देण्यात आला. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर सध्या डोसच्या सुरक्षा आणि प्रतिकारांच्या पैलूंचे मूल्यांकन करीत आहेत. या कार्यक्रमात, निरोगी व्यक्तीस २८ दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस दिले जातील. अहवालानुसार, या अभ्यासात ४५ निरोगी प्रौढांचा समावेश असेल. “१२ महिन्यांपर्यंत लक्ष ठेवल्यानंतर या लसी बाजारपेठेत व्यावसायिकपणे उपलब्ध केल्या जातील.” दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सोमवारी सांगितले की, जगातील कोविड -१९ प्रकरणांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे.