Covid-19 Vaccine | कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर गंभीर साईड इफेक्टचे सरकारने सांगितले कारण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी जगभरात व्हॅक्सीनेशन (Covid-19 Vaccine) सुरू आहे. परंतु लसीकरणामुळे अनेकप्रकारचे साईड इफेक्ट्स सुद्धा समोर येत आहेत. भारतात सुद्धा व्हॅक्सीन (Covid-19 Vaccine) घेतल्यानंतर दंडात वेदना, ताप आणि सुस्तीसारखे साईड इफेक्ट्स पहायला मिळत आहेत. अनेकदा व्हॅक्सीन घेतल्यानंतर ताबडतोब काही लोकांमध्ये प्रतिकूल परिणाम सुद्धा पहायला मिळाले.

एंजायटीची प्रकरणे आली समोर
यामध्ये एंजायटीची प्रकरणे सुद्धा समोर आली आहेत. मात्र, हे सर्व अस्थायी आहे आणि म्हटले जात आहे की व्हॅक्सीन घेतल्यानंतर इतका परिणाम होणे सामान्य आहे, आणि लस कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा आतापर्यंतचा सर्वात परिणामकारक उपाय आहे.

50 टक्केपेक्षा जास्त केस एंजायटी संबंधीत
सरकारी पॅनलच्या स्टडीमध्ये समोर आले आहे की कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर समोर आलेल्या गंभीर प्रतिकूल प्रकरणांमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त केस एंजायटी संबंधीत होत्या. नॅशनल अ‍ॅडव्हर्स इव्हेन्ट्स फॉलोविंग इम्युनायजेशन कमेटी (National AEFI Committee) ने व्हॅक्सीनेशनच्यानंतर 60 गंभीर प्रकरणांच्या अभ्यासात समजले की यापैकी 36 केस एंजाएटीशी संबंधीत होत्या, ज्या 50 टक्केपेक्षा जास्त आहेत.

एका व्यक्तीचा मृत्यू
तसेच, व्हॅक्सीन घेतल्यानंतर पाच को-अ‍ॅक्सीडेंटल प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सरकारी पॅनलच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की मृत्यूच्या पाठीमागे इतर कारणे सुद्धा असू शकतात.

 

महिलांमध्ये इंजेक्शनची भीती

एका सिनियर अधिकार्‍याने सांगितले की, लोकसंख्येच्या हिशेबाने पाहिले तर एंजायटी संबंधी बहुतांश प्रकरणे महिलांमध्ये दिसून आली. यामध्ये इंजेक्शनची भीती, व्हॅक्सीन संबंधी टाळाटाळचा सहभाग आहे. आम्हाला हे पहायचे आहे की इंजेक्शनची भीती कशी दूर करता येईल. महिलांमध्ये अशी तक्रार जास्त दिसून येत आहे.

संशोधनात कोव्हॅक्सीन घेणारे अवघे 3 लोक
व्हॅक्सीनच्या दृष्टीने पाहिले तर या संशोधनात कोविशील्ड घेणार्‍या 57 आणि कोव्हॅक्सीन घेणारे तीन लोक होते.
एकुण या छोट्या अभ्यासात आढळले की व्हॅक्सीनेशनचे लाभ नुकसानीच्या जोखमपेक्षा जास्त आहेत.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नुकसानीच्या आढळणार्‍या सर्व संकेतांना सातत्याने ट्रॅक केले जात आहे.
वेळोवेळी अत्यधिक सावधगिरीचे उपाय म्हणून प्रकरणांचे अवलोकन केले जात आहे.

रिपोर्ट आरोग्य मंत्रालयाकडे
विचार-विमर्श आणि अवलोकनानंतर नॅशनल एईएफआय कमिटीकडून मिळालेल्या मंजूरीनंतर हा रिपोर्ट 27 मेरोजी पूर्ण झाला.
तो 8 जुलैला आरोग्य मंत्रालयाकडे सोपवण्यात आला.

समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश
कोविड व्हॅक्सीनेशनच्या नंतर कॅज्युअल्टी असेसमेंटसाठी आरोग्य मंत्रालयाने विशेष समिती गठित केली होती.
यामध्ये कॉर्डियोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, मेडिकल स्पेशलिस्ट, प्रसूती-स्त्री रोग तज्ज्ञांचा समावेश आहे.

Web Title :- Covid-19 Vaccine | Covid 19 vaccines anxiety responsible for more than 50 percent of adverse reactions report

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण