Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही कोविड व्हॅक्सीन ( Covid-19 Vaccin )  घेतली आहे किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. अनेकांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर हलका ताप किंवा दुसरी समस्या होऊ शकते. अशावेळी घाबरण्याचे कारण नाही. व्हॅक्सीन घेतल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच भरपूर आराम केला पाहिजे.

Kadha In Summer : उष्ण हवामानात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा

1 ताबडतोब कामावर जाऊ नका –
Covid-19 Vaccin – व्हॅक्सीन घेतल्यावर 1-2 दिवस आराम करा. ताबडतोब कामावर जाऊ नका. व्हॅक्सीनच्या 24 तासानंतर सुद्धा साईड इफेक्ट दिसू शकतात.

लठ्ठपणा टाळायचाय तर जाहिराती पाहू नका

2 प्रवास टाळा –
व्हॅक्सीन घेतल्यानंतर 2-3 दिवस प्रवास टाळा. अमेरिकन सीडीसीच्या गाईडलाईनमध्ये व्हॅक्सीन घेतल्यानंतर प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

3 गर्दीत जाणे टाळा –
Covid-19 Vaccin व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला असेल तर गर्दीत जाणे टाळा. सुरक्षेची काळजी घ्या. 3 दिवसापर्यंत दारू आणि सिगारेट पिऊ नका. बाहेरचे खाणे टाळा.

त्वचा, केसांच्या समस्या सोडवेल ‘विलायची’, जाणून घ्या फायदे

4 हायड्रेटेड रहा –
व्हॅक्सीन घेतल्यानंतर हायड्रेट रहा. फळे, भाज्या, सुकामेवा खा. भरपूर पाणी प्या.

5 विना मास्क बाहेर पडू नका –
व्हॅक्सीन घेतल्यानंतर अनेक दिवसांनी शरीरात अँटीबॉडी बनते, या दरम्यान मास्क घातला नाही तर तुम्हालाही कोरोना होऊ शकतो. सर्वप्रकारची काळजी घ्या.

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

6 वर्कआऊट करू नका –
जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर 2-3 दिवस करू नका. व्हॅक्सीननंतर अनेक लोकांना हाताला वेदना होतात आणि अशावेळी वर्कआऊट केल्यास वेदना आणखी वाढू शकतात, म्हणून वर्कआऊट टाळा.

7 डॉक्टरांशी संपर्कात रहा –
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असेल तर व्हॅक्सीन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची समस्या होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

READ ALSO THIS :

कोरोनाबाबत अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्सवर यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चेचा ईमेल ‘लीक’

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे