चांगली बातमी : ‘कोरोना’ व्हायरसच्या लढाईसाठी वैज्ञानिकांना मिळाले मोठे ’शस्त्र’

लॉस एन्जलिस : पोलीसनामा ऑनलाइन –  अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसला निष्क्रिय करणार्‍या मानवी अँटीबॉडिजमध्ये एक अशी गोष्ट शोधून काढली आहे, जी अशा प्रकारच्या अनेक अँटीबॉडीमध्ये सामान्यपणे आढळून येते. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे कोविड-19 ची यशस्वी वॅक्सीन बनवण्यास मदत होऊ शकते. शास्त्रज्ञांनी हे संशोधन अशावेळी केले आहे जेव्हा कोरोना माहामारीने जगभरात आतापर्यंत 5,76,015 लोकांचा बळी गेला आहे.

जगात अनेक वॅक्सीन क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत, परंतु संशोधकांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस-सार्स सीवोव्ही-2 च्याविरूद्ध प्रभावीपणे काम करणार्‍या मानवी अँटीबॉडीजच्या महत्वपूर्ण अवयवाच्या बाबत अजून माहिती अस्पष्ट आहे. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित या महत्त्वपूर्ण अभ्यासात संशोधकांनी सुमारे 300 मानवी सार्स सीओव्ही-2 अँटिबॉडीजची तपासणी केली असता आढळले की, व्हायरसच्या विरूद्ध सर्वात प्रभावी पद्धतीने काम करणारा एकच जीन सहभागी आहे.

संशोधकांनी म्हटले की, सार्स-सीओव्ही-2 प्रोटीन वाढवणे आणि ते मुख्य पेशींच्या सर्फेस रिसेप्टर एसीई2 शी बांधणे आणि मानवी पेशींना संक्रमित करण्यासाठी रिसेप्टर बायंडिंग डोमेन (आरबीडी) चा वापर करतो. अँटीबॉडिज ज्या आरबीडीला निशाणा बनवू शकातात आणि एसीई2 शी जोडण्याचा मार्ग बंद करू शकतात, त्यांची मागणी जास्त होत आहे आणि त्यापैकी अनेकांची ओळख पटली आहे.

या अभ्यासात स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे युआन मेंग यांनी अशाप्रकारे 294 आरबीडीच्या यादीचे मुल्यांकन केले. त्यांना आढळले की, आयजीएचव्ही जीन कुटुंबाचा एक जीन ज्यास आयजीएचव्ही3-53 म्हटले जाते, त्याचा वापर व्हायरसचे प्रोटीन वाढवणार्‍या आरबीडीला निशाणा बनवण्यात जास्त होतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, आयजीएचव्ही 3-53 अँटीबॉडिजमध्ये ना केवळ व्हायरसच्या बदलाचा दर कमी करत आहे, तर व्हायरसला निष्क्रिय करण्यात सुद्धा जास्त प्रभावी आहे.