जानेवारीपर्यंत येऊ शकते ‘कोरोना’ वॅक्सीन, जास्त असणार नाही किंमत : अदर पूनावाला

नवी दिल्ली : पुण्याची औषध कंपनी सीरम इंन्स्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटले आहे की, पुढील वर्षी जानेवारी महिन्यापर्यंत कोरोना वॅक्सीन येऊ शकते. सोबतच त्यांनी ही सुद्धा शक्यता वर्तवली की, वॅक्सीनची किंमत सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात असेल. यापूर्वी अदर पूनावाला यांनी म्हटले होते की, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया कोविड-19 वॅक्सीनसाठी इमर्जन्सी लायसन्ससाठी अ‍ॅप्लाय करू शकते, जे युनायटेड किंगडममध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या उमेदवारांच्या परीक्षणांच्या परिणामांवर आधारित आहे.

न्यूज 18 ला दिलेल्या एका इंटरव्ह्यूत अदर पूनावाला यांनी म्हटले होते की, आतापर्यंत कोणतीही सुरक्षा चिंता नाही, परंतु वॅक्सीनच्या दिर्घकाळाचे परिणाम समजण्यासाठी 2-3 वर्ष लागतील. जगातील सर्वात मोठ्या वॅक्सीन कंपनीच्या सीईओने सांगितले होते की, डोस स्वस्त दरात लोकांना उपलब्ध करून दिले जातील आणि यास युनिव्हर्सल इम्यूनायजेशन प्रोग्राममध्ये सहभागी करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जाईल.

100 कोटी वॅक्सीन बनवण्याचा प्रोजेक्ट
सीरम इन्स्टीट्यूटने अगोदरच ऑक्सफोर्डच्या प्रोजेक्टमध्ये कोलॅबरेशन केले आहे. जर ऑक्सफोर्डची वॅक्सीन यशस्वी झाली तर भारतात तिच्या उपलब्धतेत कोणतीही अडचण येणार नाही. या कंपनीने अ‍ॅस्ट्रा झेनेका नावाच्या त्या कंपनीसोबत टायअप केले आहे, जी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत मिळून वॅक्सीन तयार करत आहे. ऑक्सफोर्डचा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासह सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया वॅक्सीनचे 100 कोटी डोस तयार करेल. यापैकी 50 टक्के भाग भारतासाठी असेल आणि 50 टक्के गरीब आणि मध्यम उत्पन्नवाल्या देशासाठी.