Covid-19 Vaccine : सध्या बाजारात नाही विकली जाणार ‘कोरोना’ची लस, नीती आयोगानं केलं स्पष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना साथी (COVID-19 epidemic) वर मात करण्यासाठी देशात लसीकरण कार्यक्रम (Vaccination program) 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाईल. लसीकरण कार्यक्रम सुरू होण्याआधी नीती आयोगाने बुधवारी हे स्पष्ट केले की आपत्कालीन वापरासाठी मंजूर झालेल्या लसींना बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नाही. नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना बाजारात विक्री करण्यास तेव्हाच परवानगी देण्यात येईल जेव्हा सरकार त्यांना परवानगी देईल.

प्रथम या लोकांना दिली जाईल लस

अलीकडे सरकारने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड (Covishield) आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन (Covaxine) च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून देशात सुरू होणार आहे. यावेळी फ्रंटलाइन कामगार आणि आरोग्य कामगारांना लस दिली जाईल. यानंतर 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईल. पोलीस आणि सैनिकांनाही लस देण्यात येणार आहे.

किंमत किती असेल

भारत बायोटेक आपली लस केंद्र सरकारला प्रति डोस 295 रुपयांनी विकत आहे. 55 लाख लसींची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे. विशेष बाब म्हणजे भारत बायोटेक केंद्र सरकारकडून फक्त 38.5 लाख लसीचे शुल्क आकारत आहे. सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला देखील 1.1 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. कोविशिल्ड लसची किंमत प्रति डोस 200 रुपये आहे.

बाजारात इतकी असू शकते किंमत

रम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी मागील काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, एकदा परवानगी मिळाल्यानंतर ते आपल्या कंपनीची लस कोविशिल्ड बाजारात एक हजार रुपयांना विकतील.

कोविन अ‍ॅपची असेल सर्वात महत्वाची भूमिका

लसीकरण मोहिमेतील सर्वात मोठी भूमिका कोविन अ‍ॅप (Co-WIN App) ची राहील, जो की संपूर्ण लसीकरण मोहिमेचा कणा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोविन अ‍ॅप तयार करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू केली गेली होती, ही संपूर्ण व्यवस्थापन प्रणाली अ‍ॅप आणि पोर्टल म्हणून उपलब्ध आहे. जिथे जिथे लसीकरण व्हायचे आहे, तो पॉईंट किंवा लसीकरण स्थळाचा पत्ता जसे की जिल्हा अधिकारी आकडेवारी अपलोड करताच लसीकरण स्थळ (vaccination site) तयार केले जाईल.

संपूर्ण यंत्रणा कशी काम करेल

ही लस केवळ संमतीने दिली जाईल. ज्या व्यक्तीने घेण्यास नकार दिला त्या व्यक्तीची माहिती सूचीतून काढून टाकली जाईल. जर एखादी व्यक्ती जिचे नाव लस घेण्याऱ्यांच्या यादीमध्ये असेल आणि त्याला लसीकरण जागेपर्यंत पोहोचता आले नाही, तर पुढे त्याचे नाव जेथे लसीकरण होईल त्यामध्ये समाविष्ट केले जाईल. म्हणजेच हे अगदी स्पष्ट आहे की ज्या दिवशी आपल्याला लसीकरणाची वेळ देण्यात आली आहे, जर आपण त्या दिवशी पोहोचू शकला नाहीत तर पुढे जेव्हा कधी लसीकरण होईल तेव्हा आपल्याला लस देण्यात येईल.