खुशखबर ! ‘या’ महिन्यात भारताला मिळणार ‘कोरोना’विरुद्धची ‘लस’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचे २०,८०६,९३९ रुग्ण झाले आहेत. तर ७४७,२५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी संपूर्ण जगाचे लक्ष लस कधी तयार होती याकडे लागून राहिले असतानाच. रशियाने Sputnik V नावाची कोरोनाची लस तयार केली आणि त्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली. इतकेच नव्हे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचं सांगितलं.

जगभरातील देशांना नोव्हेंबरपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध करुन दिली जाईल अशी माहिती लशीसाठी रिसर्च फंडिंग करणाऱ्या समूहाचे प्रमुख किरिल दमित्रीव म्हणाले. २० देशांनी रशियाची लस खरेदी करण्यास तयारी दर्शवली आहे. भारताला सुद्धा नोव्हेंबरपर्यंत लस मिळण्याची अपेक्षा आहे. तर रशियाने कोरोना लशीचे तिसऱ्या टप्पातील ट्रायल केलेलं नाही. कोणतीही लस तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल न करताच त्याच्या उत्पादनास परवानगी देणे हे धोकादायक ठरु शकते, असं WHO च्या प्रवक्त्या क्रिस्ट्रियन लिंडमियर यांनी म्हटलं.

याबाबत बोलताना दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, “रशियाची ही लस जर यशस्वी ठरली तर ती किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे पाहावे लागेल आणि तस असेल तर लशीच मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे.” रशियन आरोग्य मंत्रालयाच्या संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेने ही लस तयार केली आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितल्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबर महिन्यापासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येणार आहे.

मात्र ही लस सुरक्षित असल्याचा दावा RDIF किरिल दमित्रीव यांनी केला. पुढच्या काही दिवसात लस दिल्यानंतरचा डेटा प्रकाशित केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रशियाने आतापर्यंत लशीसंदर्भात कोणताही वैज्ञानिक डाटा प्रकाशित न केल्याने त्या लशीबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. दरम्यान, भारताला रशिया नोव्हेंबर पर्यंत लस उपलब्ध करुन देऊ शकेल अशी माहिती मिळत आहे.