कोरोनाने संक्रमित लोकांवर व्हॅक्सीनचा वेगळा परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींच्या शरीरात कोविड-19 व्हॅक्सीन (Covid-19 Vaccine) चा सिंगल डोस खुपच चांगला रिस्पॉन्स करत आहे. अशा लोकांमध्ये संक्रमित न झालेल्या लोकांच्या तुलनेत अँटीबॉडी (Antibody) चा जास्त चांगला रिस्पॉन्स दिसून आला आहे. AIG हॉस्पिटलने सोमवारी याबाबत एक स्टडी जारी केला आहे.

एआयजी हॉस्पिटल्सच्या 260 हेल्थकेयर वर्कर्सवर आधारित हा स्टडी ’इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिसीज’ मध्ये प्रकाशित झाला आहे.
स्टडीत सहभागी झालेल्या हेल्थकेयर वर्कर्सना 16 जानेवारीपासून 5 फेब्रुवारीदरम्यान व्हॅक्सीनेट करण्यात आले होते.
हा स्टडी सर्व रूग्णांमध्ये इम्यूनोलॉजीकल मेमरी रिस्पॉन्स जाणून घेण्यासाठी करण्यात आला होता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

स्टडीत हे सुद्धा समजले की, व्हॅक्सीन (Covid-19 Vaccine) च्या पहिल्या डोसने बनलेल्या टी-सेल्स कोविड-19 ने अगोदर संक्रमित झालेल्या लोकांच्या शरीरात जास्त चांगला रिस्पॉन्स देतात. इन्फेक्शन न झालेल्या लोकांच्या शरीरात पहिल्या डोसचा परिणाम इतका चांगला नसतो.
एआयजी हॉस्पिटलचे चेयरमन आणि या स्टडीचे सह लेखक डी. नागेश्वर रेड्डी यांच्यानुसार, आकडे सांगतात की, कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या लोकांना व्हॅक्सीनचे दोन डोस देण्याची आवश्यकता नाही.
अशा लोकांमध्ये अँटीबॉडी बनने आणि मेमरी सेल्सच्या रिस्पॉन्ससाठी एक डोस पुरेसा आहे.
ज्या लोकांना अगोदर इन्फेक्शन झालेले नाही त्यांच्यासाठी दोन डोस आवश्यक आहेत.

डॉ. रेड्डी यांनी म्हटले की, देशात व्हॅक्सीन(Covid-19 Vaccine)ची कमतरता असताना हा स्टडी खुप महत्वाचा ठरू शकतो. यामुळे आपण कमी वेळात जास्त लोकांचे लसीकरण करू शकतो आणि व्हॅक्सीनच्या डोसपासून वंचित लोकसंख्येसाठी व्हॅक्सीन वाचवू शकतो.त्यांनी म्हटले की, एकदा अपेक्षित लोकसंख्येला व्हॅक्सीनेट करून हर्ड इम्यूनिटी मिळवली की संक्रमित झाल्यानंतर एक डोस घेणारे नंतर दुसरा डोस सुद्धा घेऊ शकतील. डॉ. रेड्डी यांनी म्हटले की, आपल्याला उपलब्ध व्हॅक्सीनचे वाटप रणनिती अंतर्गत केले पाहिजे. व्हॅक्सीन देण्याची योजना अशी असावी की जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी व्हॅक्सीनचा एक डोस देता येईल.

व्हॅक्सीनच्या कमतरतेमुळे केंद्र सरकारने 13 मे रोजी कोविशील्डच्या दोन्ही डोसमधील अंतर 6-8 आठवड्यांनी वाढवून 12-16 आठवडे करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे कोविशील्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान घेण्याची शिफारस करण्यात आली होती.
आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की,
दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे आणि यामुळे लोकांमध्ये संसर्गाचा अतिरिक्त धोका वाढणार नाही.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : corona vaccine single dose is sufficient for already infected person says study

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप